24.4 C
Latur
Monday, September 20, 2021
Homeराष्ट्रीयतिसरी लाट ९८ दिवसांची; लसीकरण हाच वाचण्याचा मार्ग

तिसरी लाट ९८ दिवसांची; लसीकरण हाच वाचण्याचा मार्ग

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारतामधील कोरोनाची तिसरी लाट ही दुस-या लाटेप्रमाणेच अधिक घातक असेल़ तिसरी लाट देशात ९८ दिवसांची असण्याची शक्यता असून तिस-या लाटेचे देशावर गंभीर परिणाम होतील अशी शक्यता देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असणा-या स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआयने) नुकत्याच जारी केलेल्या आपल्या अहवालामध्ये व्यक्त केली आहे.

इतर देशांमध्ये तिस-या लाटेत काय घडले याचा संदर्भ देत भारतामधील यंत्रणांना या अहवालामधून सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. इकोरॅप नावाच्या या अहवालामध्ये कोरोना कालावधीत अर्थव्यवस्थेने कशी कामगिरी केली यासंदर्भातही भाष्य करण्यात आले आहे. एसबीआयच्या या अहावालामध्ये दिलेल्या माहितीनुसार ज्या मोठ्या देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट १०८ दिवसांपर्यंत होती त्या देशांमध्ये तिसरी लाट सरासरी ९८ दिवसांपर्यंत टीकली. तसेच इतर देशांमधील ट्रेण्ड पाहिल्यास तिस-या लाटेमध्ये दुस-या लाटेपेक्षा १.८ पट अधिक रुग्ण आढळून येतील. जागतिक स्तरावर दुस-या लाटेमध्ये पहिल्या लाटेपेक्षा ५.२ पट अधिक रुग्ण आढळून आले होते. भारतामध्ये मात्र पहिल्या लाटेच्या तुलनेत दुस-या लाटेत ४.२ टक्के अधिक रुग्ण आढळून आलेले. ही सरासरी जागतिक सरासरीपेक्षा कमी होती.

तिसरी लाट भारतासाठी धोकादायक
जगभरातील वेगवेगळ्या देशांमध्ये येऊन गेलेल्या तिस-या लाटांचा अभ्यास केला असता भारतामधील तिसरी लाट अधिक धोकादायक असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे़ मात्र त्याचवेळी कोरोनाच्या या तिस-या लाटेचा सामना करण्यासाठी चांगल्या पद्धतीने, सुनियोजित कार्यपद्धतीचा अवलंब करत तयारी करण्यात आली तर या लाटेचा धोका आणि परिणाम कमी करण्यात यश मिळू शकते, असेही अहवालात म्हटले आहे.

लसीकरणाचा वेग वाढविणे अत्यावश्यक
आरोग्य व्यवस्था चांगल्या पद्धतीने काम करण्यासाठी मूलभूत सुविधा आणि लसीकरणाचा वेग वाढवण्याची गरज आहे. या दोन गोष्टी केल्यास गंभीर रुग्णांची संख्या २० ते ५ टक्क्यांपर्यंत कमी करता येईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. मोठ्या प्रमाणात लसीकरण झाले आणि आरोग्य व्यवस्थेला बळकटी दिल्यास परिस्थिती दुस-या लाटेपेक्षा अधिक चांगली असू शकते. मात्र आरोग्य सुविधा आणि लसीकरणाच्या जोरावर तिस-या लाटेतील मृतांची संख्या ४० हजारांवर थोपवता येईल, असे एसबीआयच्या अहवालात म्हटले आहे़

लहान मुलांसाठी सर्वात अधिक धोका
तिसरी लाट ही लहान मुलांसाठी धोकादायक ठरु शकते असे एसबीआयने आपल्या अहवालात म्हटले आहे. त्यामुळेच अहवालामध्ये जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण करण्यावर भर देण्याची गरज असल्याचे नमूद करण्यात आले आहे. सर्वात आधी लहान मुलांचे लसीकरण करणे गरजेचे असल्याचे या अहवालात म्हटले आहे. देशामध्ये १५ ते १७ कोटी मुले ही १२ ते १८ वयोगटातील असून त्यांना कोरोनाच्या तिस-या लाटेचा मोठा फटका बसण्याची शक्यता असल्याने लसीकरणामध्ये या मुलांना प्राधान्य दिले जावे, असे एसबीआयने म्हटले आहे.

वापरात नसलेले व्हॉट्सअ‍ॅप खाते बंद होणार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या