ऋषिकेश : भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी विजयादशमीच्या निमित्त केलेल्या संबोधनात चीन आणि पाकिस्तानला कडक शब्दात इशारा दिला आहे. नवा भारत नव्या पद्धतीने विचार करतो आणि आम्ही भारतातच नाही तर परदेशी धरतीवरही लढू, जिथे धोका दिसेल तिथे आम्ही प्रहार करू’ असे अजित डोवाल यांनी सांगितले.
चीनसोबत वास्तविक नियंत्रण रेषेवरील तणावादरम्यान डोवाल यांनी ऋषिकेशच्यामध्ये संतांच्या एका सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी भारताच्या बदललेल्या दृष्टिकोनाबद्दल भाष्य केले. अजित डोवाल हे ऋषिकेशच्या परमार्थ निकेतन आश्रमाला संबोधित करत होते. ‘भारताने कधीही कुणावर अगोदर आक्रमण केलेले नाही, परंतु, नव्या रणनीतीप्रमाणे सुरक्षा धोके कमी करण्यासाठी कदाचित आपल्याला यापुर्वीच कारवाई करायला हवी होती’ असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे. ‘आम्ही तुमची जिथे इच्छा असेल तेथेच लढू असेच नाही तर जिथून धोक्याला सुरुवात होते तेथपर्यंत आम्ही युद्ध घेऊन जाऊ ’ अशा शब्दात चीन व पाकिस्तानला कडक इशारा दिला. ‘भारताची ही नवी विचारधारा’ असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
परमार्थासाठी युद्ध
‘आम्ही कधीही आपल्या स्वार्थासाठी युद्ध केलेले नाही. आम्ही युद्ध तर करणार. आपल्या जमिनीवरही आणि बाहेरही करू परंतु, आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी नाही तर परमार्थासाठी करू…’ असेही डोवाल यांनी म्हटले आहे. अधिकृत सूत्रांनूसार, डोवाल यांनी हे वक्तव्य सद्य स्थितीवर कोणत्याही देशाविरुद्ध नव्हे तर भारतातील ऐतिहासिक घटनांबाबत बोलताना केल्यााचे सांगण्यात येत आहे.
सास्तूर येथील अत्याचार झालेल्या पीडित मुलींसाठी निषेध मोर्चा !