29.9 C
Latur
Friday, January 21, 2022
Homeराष्ट्रीयसत्तांतरासाठी हीच योग्य वेळ - सोनिया गांधी यांचे बिहारी जनतेला आवाहन

सत्तांतरासाठी हीच योग्य वेळ – सोनिया गांधी यांचे बिहारी जनतेला आवाहन

एकमत ऑनलाईन

पाटणा : बिहारमधील नितीश कुमार यांचे सरकार अहंकारात बुडालेले आहे. आता या अहंकारी सरकारला बदलण्याची वेळ आली आहे, असे काँगे्रसच्या अध्यक्ष सोनिया गांधी म्हणाल्या.

बिहारमध्ये बुधवार दि़ २८ ऑक्टोबर रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मतदानापूर्वी काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर हल्लाबोल केला. बिहारच्या ऐतिहासिक आणि पवित्र भूमीला मी नमन करते. आज बिहारमधील सत्ता आणि अहंकारात बुडालेले सरकार आपल्या मार्गावरुन भरकटले आहे. आज कामगार असहाय्य झाले आहेत. शेतकरीही चिंतेत आहेत. तर तरूण वर्गही निराश आहे, असे सोनिया गांधी म्हणाल्या.

अर्थव्यवस्थेच्या बिकट परिस्थितीचा आज लोकांना त्रास होत आहे. बिहारची जनता आज काँग्रेस महाआघाडीसोबत उभी आहे. आज बिहारची हीच मागणी आहे, असेही त्या म्हणाल्या. दिल्ली आणि बिहारमधील सरकार बंदी घालणारी आहेत. नोटबंदी, व्यापार बंदी, आर्थिक बंदी, शेती बंदी आणि रोजगार बंदी केली जात आहे. याविरोधात बिहारमधील जनता एकजूट झाली आहे. आता बदल करण्याची वेळ आहे. आता नवे विचार आणि नवी शक्ती निर्माण झाली असून, नव्या भारताचा अध्याय लिहिण्याची हीच वेळ असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.

बिहार भारताचा आरसा
बिहारच्या नागरिकांमध्ये गुण, कौशल्य, सामर्थ्य, शक्ती आहे. परंतु बेरोजगारी, स्थलांतर, महागाई आणि उपासमारीसारख्या बाबींमुळे त्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत. जे आपल्याला बोलता येत नाही त्यांना अश्रूंद्वारे वाट करून दिली जात आहे. गुन्ह्यांच्या जोरावर धोरणे आणि सरकार उभे करता येत नाही. बिहार हा भारताचा आरसा आहे आणि एक आशा आहे. भारताचा विश्वास आहे. बिहार हा भारताची शान आणि अभिमानही असल्याचे सोनिया गांधी म्हणाल्या.

मांजरा धरण शंभर टक्के भरले, ग्रीन बेल्ट सुखावला

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या