23.8 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeराष्ट्रीययंदा ३ हजारांहून अधिक टन धान्य उत्पादन होणार

यंदा ३ हजारांहून अधिक टन धान्य उत्पादन होणार

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : चौथ्या अग्रीम अंदाजानुसार २०२१-२२ मध्ये देशात ३ हजार १५७ लाख टन अन्नधान्याचे उत्पादन अपेक्षित आहे. हे उत्पादन २०२०-२१ मधील अन्नधान्याच्या उत्पादनापेक्षा ५० लाख टन अधिक असणार आहे. २०२१-२२ मध्ये एकूण डाळी आणि तेलबियांचे विक्रमी उत्पादन अनुक्रमे २७७ आणि ३७७ लाख टन इतके असल्याचा अंदाज असल्याची माहिती केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी दिली आहे. रब्बी हंगाम २०२२-२३ साठी राष्ट्रीय कृषी परिषदेचे नरेंद्रसिंह तोमर यांनी उद्घाटन केले, त्यावेळी ते बोलत होते.

केंद्र आणि राज्य सरकारे एकत्रितपणे कृषी क्षेत्रात आपली जबाबदारी पार पाडत आहेत. उत्पादनाच्या बाबतीत देशात बरेच काम झाले आहे. त्यामुळे अन्नधान्य, डाळी आणि तेलबियांच्या उत्पादनात वाढ झाली आहे. आज कृषी क्षेत्रापुढील आव्हाने हाताळणे आणि त्यांचे निराकरण करण्याला प्राधान्य असल्याचे मत तोमर यांनी व्यक्त केले आहे. २०२२-२३ या वर्षासाठी एकूण अन्नधान्य उत्पादनाचे राष्ट्रीय उद्दिष्ट ३२८० लाख टन ठेवण्यात आले असून त्यात रब्बी हंगामाचा वाटा १६४८ लाख टन असेल.

सेंद्रिय आणि नैसर्गिक शेतीला चालना
प्रधानमंत्री फसल विमा योजनेचा उल्लेख देखील यावेळी तोमर यांनी केला. या योजनेअंतर्गत शेतक-यांना त्यांच्या पिकांसाठी नुकसानभरपाई म्हणून १.२२ लाख कोटी रुपये देण्यात आले आहेत. सर्व शेतक-यांना या योजनेच्या कक्षेत आणले पाहिजे. यामुळे विशेषत: लहान शेतक-यांना सुरक्षित वाटेल, असे तोमर म्हणाले. रासायनिक खतांच्या वापरामुळे जमिनीची उत्पादकता कमी होत आहे. त्यामुळे सेंद्रिय आणि नैसर्गिक शेतीला चालना देण्यात येत असल्याचे देखील त्यांनी दिली.

मोहरीचे उत्पादनात वाढ
मोहरी उत्पादन मोहिमेच्या अंमलबजावणीच्या पहिल्या दोन वर्षात मिळालेल्या यशाबद्दल तोमर यांनी समाधान व्यक्त केले. मोहरीचे उत्पादन गेल्या दोन वर्षात ९१.२४ वरून २९ टक्क्यांनी वाढून ११७.४६ लाख टन झाले आहे. उत्पादकता १ हजार ३३१ वरुन १ हजार ४५८ वर १० टक्क्यांनी वाढली आहे. रेपसीड आणि मोहरीचे क्षेत्र २०१९-२० मध्ये ६८.५६ वरून १७ टक्क्यांनी वाढून २०२१-२२ मध्ये ८०.५८ लाख हेक्टर झाले आहे.

डिजिटल कृषी मिशनवरही कामाची गरज
केंद्र सरकारने शेतकरी आणि सरकारमधील दरी कमी करण्यासाठी डिजिटल शेतीचे काम सुरू केले आहे. डिजिटल कृषी मिशनवरही एकत्र काम करण्याची गरज आहे. पंतप्रधानांच्या प्रयत्नाने २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून साजरे केले जाणार आहे. संपूर्ण जगात भारत या कार्यक्रमाचे नेतृत्व करणार आहे. भरड धान्याचे उत्पादन आणि निर्यात वाढून शेतक-यांचे उत्पन्न वाढावे हा शासनाचा प्रयत्न आहे.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या