22.4 C
Latur
Saturday, June 19, 2021
Homeराष्ट्रीययंदाही कृषि क्षेत्राची घोडदौड असणार

यंदाही कृषि क्षेत्राची घोडदौड असणार

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशात गेल्या दीड वर्षापासून कोरोना साथीने ठाण मांडले आहे. गतवर्षी केंद्र सरकारच्या वतीने कोरोना नियंत्रणासाठी देशव्यापी लॉकडाऊन लावण्यात आला होता. परिणामी सर्वच उद्योगधंदे ठप्प राहिल्याने देशाच्या आर्थिक विकासदरात प्रचंड मोठी घसरण झाली होती. मात्र त्या काळातही कृषि क्षेत्राने दैदिप्यमान वाढ नोंदवली होती. यंदाही कोरोनाच्या दुस-या लाटेमुळे अनेक राज्यात कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे. परिणामी यंदाही उद्योगासह सेवाक्षेत्राची वाढ नकारात्मक राहण्याची शक्यता आहे. मात्र यंदाही कृषि क्षेत्राची मोठी वाढ होणार असल्याचे अंदाज कृषितज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

कोरोनाच्या दुस-या लाटेत महाराष्ट्रासह देशातील प्रमुख अशा १२ राज्यांत कडक संचारबंदी लावण्यात आली आहे. परिणामी उद्योग क्षेत्राची वाढ नकारात्मक राहणार आहे. सेवाक्षेत्राचीही वाढ यथा-तथाच राहणार असल्याची चर्चा आहे. मात्र दुसरीकडे गतवर्षीप्रमाणे यंदाही चांगले म्हणजे सरासरीच्या ९८ टक्के पर्जन्यमान राहणार असल्याने कृषि क्षेत्राची वाढ चांगली होणार असल्याचे सांगितले जात आहे. कृषि व्यवसाय संस्था कॉमट्रेडचे संचालक अभिषेक अग्रवाल यांनी ही माहिती दिली आहे. कृषि क्षेत्राचा लक्षणीय वृद्धीदर २०२१-२२ मध्येही कायम राहणार असला तरी सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या (जीडीपी) वृद्धीला सावरण्यासाठी तो पुरेसा नसेल, असेही विश्लेषकांनी म्हटले आहे. २०२० मध्ये कोविड-१९ साथीमुळे कठोर लॉकडाऊन लावण्यात आला होता. ले होते. तरीही, कृषिक्षेत्राने चांगली कामगिरी केली. जून २०२० च्या तिमाहीत इतर क्षेत्रांची २४.४ टक्क्यांनी घसरण झालेली होती. मात्र कृषिक्षेत्राची ३.४ टक्क्यांनी वाढ झाली होती.

सलग ३ वर्षे सामान्य मॉन्सून
भारतीय हवामान खात्याने १६ एप्रिल रोजी जारी केलेल्या अंदाजानुसार यंदा जून ते सप्टेंबर या काळात चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. सरासरी ९८ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज आहे. मागील दोन दशकांच्या इतिहासात सलग तीन वर्षे मान्सून सामान्य राहाण्याची घटना फक्त दोन वेळा घडली आहे. ९४ ते १०६ टक्के मान्सून सामान्य गणला जातो.

रासायनिक खतांच्या मागणीत वाढीचे संकेत
कृषिक्षेत्राची कामगिरी चांगली राहील, याचे संकेत सर्व घटकांद्वारे मिळत आहेत, असे अभिषेक अग्रवाल यांनी सांगितले आहे. दुसरीकडे कृषि मंत्रालयातील अधिका-याने दिलेल्या माहितीनूसार यंदा खरीप हंगामात खतांची मागणी १० टक्क्यांनी वाढून ३२ दशलक्ष टनांवरून ३५ दशलक्ष टनांवर जाईल, असे दिसून येत आहे.

स्पुटनिक व्ही लसीचे दीड लाख डोस भारतात दाखल

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
203FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या