36.5 C
Latur
Saturday, April 17, 2021
Homeराष्ट्रीययंदाचा नवरात्रोत्सव गरब्याच्या झगमगाटाविनाच

यंदाचा नवरात्रोत्सव गरब्याच्या झगमगाटाविनाच

एकमत ऑनलाईन

गांधीनगर : गणेश उत्सवानंतर तरुणांच्या आवडीचा उत्सव म्हणजे नवरात्ऱ कारण त्यात गरबा आणि दांडियाचे नृत्य बेभान होऊन तरुणाई आपले भान विसरते़; मात्र यावर्षी या उत्सावावर कोरोनाचे सावट असल्याने तरुणाईचा हिरमोड झाला आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवीची पूजा करून घटस्थापना होते आणि प्रारंभ होतो तो नवरात्रीच्या जागरणाला. हीच सुरुवात असते ती गरबा-दांडियाच्या जल्लोषाची. तसेच, गरबा आणि दांडिया म्हटले की, गुजरात राज्याचे नाव आपसुकच तोंडावर येणार; पण गुजरात सरकारने कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहून यंदा नवरात्रीमध्ये गरबा खेळण्यावर बंदी घातली आहे.

गुजरात सरकारने कोरोना विषाणूची वाढता प्रादुर्भाव पाहून आज, शुक्रवारी सण-उत्सवासाठी नियमावली जारी केली आहे. नवरात्री गरबा, दसरा, दिवाळी, गुजराती नवीन वर्ष आणि शरद पोर्णिमाच्या दिवशी आयोजित केल्या जाणा-या कार्यक्रमासाठी नियमावली जारी केली आहे. नवरात्री उत्सावाला अवघे आठ दिवस शिल्लक राहिले असतानाच गुजरात सरकारने ही नियमावली जाहीर केली आहे.

राज्यातील सध्याची कोरोना विषाणूची परिस्थिती पाहता गुजरात सरकारने नवरात्र आणि त्यानंतर येणा-या सण उत्सवासाठी नियमावली तयार केली आहे. १५ ऑक्टोबर २०२० पासून राज्यात हे नियम लागू होणार आहेत. नवरात्रीमध्ये सार्वजनिक ठिकाणी देवीच्या मूर्तीची स्थापना आणि पूजा करु शकता. पण, फोटो किंवा मूर्तीला स्पर्श करणे आणि प्रसाद वाटण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच स्थानिक प्रशासनाच्या संमतीनंतर देवीच्या मूर्तीची स्थापना करता येईल. नियमांनुसार, कार्यक्रमाला उपस्थित असणा-यांमध्ये सहा फूटांचे अंतर असावे. शिवाय मास्कचा वापरही बंधनकारक करण्यात आला आहे.

मास्क, सॅनिटायझर आणि हँडवॉश बाळगणे अत्यावश्यक
कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवायची असल्यास सॅनिटाजर किंवा हँडवॉश जवळ असावे. कार्यक्रमादरम्यान थुंकल्यास मोठा दंड आकरण्यात येणार आहे. शिवाय गर्भवती महिला आणि इतर आजार असणा-यांनाही कार्यक्रमात येण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

रावण दहनासाठी २०० लोकांची मर्यादा
रॅली, रावण दहनाचा कार्यक्रम, शोभा यात्रा आणि रामलीलासारख्या कार्यक्रमात २०० पेक्षा जास्त लोक उपस्थित राहू शकत नाहीत. तसेच, या कार्यक्रमासाठी फक्त एक तासांचा वेळ देण्यात आला आहे.

गुजरातमध्ये पुर्णत: बंदी
कोरोनाचा वाढता प्रभाव बघता गुजरात सरकारने जारी केलेल्या नियमांनुसार, नवरात्रीदरम्यान राज्यात कुठेही गरब्याचे आयोजन करण्यावर बंदी आहे.

ज्येष्ठ आणी चिमुकल्यांना कार्यक्रमात येण्यास अटकाव
गुजरात सरकारने देवीच्या मंडपानजीक अथवा कार्यक्रमात ६० वर्ष किंवा त्यापेक्षा आधिक वय असणा-यांना आणि १० वर्षांपेक्षा कमी वय असणा-या लहानग्यांना येण्यास बंदी आहे.

वेळ आल्यास मराठा आरक्षणासाठी तलवारही हाती घेईन – संभाजीराजे

 

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,476FansLike
168FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या