27.3 C
Latur
Tuesday, October 19, 2021
Homeराष्ट्रीयअयोध्येत यंदाची दिवाळी विशेष, गिनीज बुकात होणार नोंद

अयोध्येत यंदाची दिवाळी विशेष, गिनीज बुकात होणार नोंद

एकमत ऑनलाईन

अयोध्या : प्रभु श्रीरामांची जन्मभुमी अयोद्धेसाठी यंदाची दिवाळी अधिक उज्ज्वल असणार आहे. यंदा अयोध्या ५ लाख ५१ हजारांहून अधिक दिव्यांनी झगमगून जाणार आहे. यामुळे अयोध्या नगरीचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले जाणार आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सन २०१७ पासून अयोध्येत दीपोत्सव साजरा करण्याची सुरुवात केली होती.

योगी आदित्यनाथांनी जेव्हा अयोद्धेत दीपोत्सवाला सुरुवात केली होती, त्यावेळी १ लाख ६५ हजार दीप उजळण्यात आले होते. तसेच सन २०१८ मध्ये ३ लाख १५० दिवे लावण्यात आले. त्यावेळी जागतिक विक्रम झाला होता. यानंतर सन २०१९ मध्ये ५ लाख ५१ हजार दिवे लावून जागतिक विक्रम रचला गेला होता.यंदा त्यापेक्षाही जास्त दिवे (सुमारे ६ लाख दिवे) लावून अयोध्येतील २४ घाट दिव्यांच्या प्रकाशाने न्हाऊन निघणार आहेत. कोरोनाचा प्रोटोकॉल लक्षात घेत सर्व नियमांचे पालन करण्यासाठी व्यापक व्यवस्था केल्याचेही प्रशासनाच्यावतीने सांगण्यात येत आहे. करण्यात आली आहे.

२९ हजार लीटर तेलाचा वापर
या वेळी अयोध्येत २४ घाटांवर ६ लाख दिवे प्रज्वलित करण्यात येणार आहेत. यासाठी २९ हजार लीटर तेलाचा वापर करण्यात येणार आहे. दिव्यांच्या प्रकाशाने अयोध्येला प्रकाशमान करण्यासाठी ७.५ लाख किलो रुईचा देखील वापर होणार आहे. राममंदिर निर्माण करण्याच्या निर्णयानंतर दीपोत्सवासाठी रामनगरीचे साधुसंत आणि भक्तांमध्ये उत्साह आहे.

‘ईसीएलजीएस’ला केंद्र सरकारकडून मुदतवाढ

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या