23.6 C
Latur
Tuesday, October 4, 2022
Homeराष्ट्रीयकोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड घेणा-यांना मिळणार कॉर्बेवॅक्सचा बुस्टर

कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड घेणा-यांना मिळणार कॉर्बेवॅक्सचा बुस्टर

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी भारतासह अनेक देशांमध्ये लसीकरणावर भर दिला जात असून भारतामध्ये यासाठी कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड लसींचा वापर केला जात आहे. सध्या भारतामध्ये बुस्टर डोस देण्यास सुरुवात करण्यात आली असून दोन डोसमधील अंतरही केंद्राने कमी केले आहे. या सर्वामध्ये आता कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनचे दोन डोस घेणा-यांना बुस्टर डोस म्हणून जैविक ई कॉर्बेवॅक्स लस वापरली जाणार असून, याच्या वापराला केंद्राने परवानगी दिली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. हा डोस १८ वर्षांवरील व्यक्तींसाठी उपलब्ध असणार आहे.

२४ तासांत १६,०४७ नव्या रूग्णांची नोंद
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या अहवालानुसार, गेल्या २४ तासांत देशात कोरोनाची लागण झालेल्या १६,०४७ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे देशात कोरोनाच्या सक्रिय रूग्णांची संख्या १,२८,२६१ वर पोहोचली आहे. तर, २४ तासांत कोविडमधून बरे झालेल्या लोकांची संख्या १९,५३९ इतकी आहे. केंद्र सरकारकडून लसीकरण करण्यावर भर दिला जात असून केंद्राने राज्यांना संक्रमित व्यक्तींच्या उपचारासाठी योग्य व्यवस्था करण्याच्या सूचनांसह उपचारांच्या संपूर्ण प्रक्रियेचे पालन करण्यास सांगितले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या