गुवाहाटी : राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी अर्थात एनआरसी पुन्हा एकदा चर्चेत आली असून, आसामच्या एनआरसी अधिका-यांनी जिल्हा अधिका-यांना गेल्या वर्षी प्रकाशित करण्यात आलेल्या अंतिम यादीतून अपात्र व्यक्तींची नाव हटवण्याचे आदेश दिले आहेत.
अपात्रांची ही संख्या जवळपास १० हजारांच्या घरात आहे. एनआरसीच्या वरिष्ठ अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, आसामच्या ३३ जिल्ह्यांतील नागरिक नोंदणीकरणाचे उपायुक्त आणि जिल्हा रजिस्ट्रार यांना राज्यातील सर्वात वरिष्ठ अधिकारी हितेश देव सरमा यांचे एक पत्रही मिळाले आहे़ या पत्राद्वारे या हजारो लोकांना ताब्यात घेण्यासाठी अध्यक्षांकडून आदेश जारी करण्याबाबत विचारणा करण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे़ तुमच्याकडून मिळालेल्या अहवालानुसार, घोषित परदेशी संशयित मतदार विदेशी न्यायाधिकरणांमध्ये प्रलंबित अशा श्रेणिंशी संबंधीत अपात्र व्यक्तींनी, त्यांच्या वंशजांसोबत एनआरसीमध्ये प्रवेश मिळवला आहे, असा उल्लेख सरमा यांनी आपल्या पत्रात केला आहे़
एनआरसी ला सत्यपडताळणीचा अधिकार
एनआरसी नियमांनुसार, अंतिम एनआरसीच्या प्रकाशनापूर्वी किंवा कोणत्याही समयी चुकीचे समावेशन किंवा बहिष्काराची सत्यपडताळणी करण्याचा तसेच हटवण्याचा अधिकार अधिका-यांना आहे.
बांगलादेशींना करण्यात आले बाहेर
अनेक वास्तविक नागरिकांना (१९७१ पूर्वी बांगलादेशातून भारतात दाखल झालेले विशेष शरणार्थी) या यादीतून बाहेर करण्यात आल्याचे, अंतिम यादी प्रकाशित करण्यात आल्यानंतर भाजपने म्हटले होते़ हे दोषपूर्ण असून सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली जाईल, असे आसामचे मंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी म्हटले होते़
करमाळा शहर व परीसरात पावसाचा हाहाकार ; ग्रामपंचायत कार्यालयात पाणी घुसले, पिकांचेही नुकसान