27.4 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeराष्ट्रीयज्ञानवापी मशिदीवरून भाजप नेत्याला धमकी

ज्ञानवापी मशिदीवरून भाजप नेत्याला धमकी

एकमत ऑनलाईन

अलवर : राजस्थानमधील अलवर येथील भाजप नेत्या चारुल अग्रवाल यांना ज्ञानवापी मशिदीबाबत सोशल मीडियावर भाष्य करणे कठीण बनले आहे. चारुल यांना त्यांच्या सोसायटीच्या लिफ्टजवळ धमकीचे पत्र मिळाले आहे. यामध्ये धमकी देणा-या व्यक्तीने शिरच्छेद करून ५६ तुकडे करण्याची धमकी दिली. याबाबत चारुल यांनी पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली आहे.

चारुल यांनी सांगितले की, मी संभल (यूपी) येथून बीएससी आणि मुरादाबादमधून एमएसी केले आहे. त्यानंतर आयआयटी दिल्लीतून एम.टेक. केले. सध्या मी अलवर इथे टॉवर क्रमांक ३ मध्ये राहते. सोमवारी सकाळी ७.४५ वाजता मुलांना शाळेत सोडण्यासाठी मी फ्लॅटच्या बाहेर आली असता, मला खिडकीजवळ एका लिफाफ्यात एक पत्र दिसले. त्यात जीवे मारण्याची धमकी देत ​२५ सप्टेंबर ही तुमची शेवटची तारीख असेल अशी धमकी दिली.

उदयपूरमधील घटनेचा दिला इशारा
ज्ञानवापी आमची आहे आणि आमचीच राहणार असेही या पत्रात म्हटले आहे. आमच्या धर्माबद्दल पोस्ट लिहिली तर उदयपूरमध्ये कन्हैयालालची जी अवस्था झाली, तीच अवस्था तुमची होईल असे सांगत गुस्ताख-ए-रसूलच्या शिक्षेनुसार तुमचे ५६ तुकडे करू अशी धमकीही त्यांनी देण्यात आल्याचे चारुल यांनी सांगितले. चारुल यांनी ज्ञानवापीबद्दल एक पोस्ट शेअर केली होती. १३ सप्टेंबर रोजी चारुल यांनी फेसबुकवर ज्ञानवापीबद्दल एक पोस्ट टाकली होती. त्यानंतर १९ सप्टेंबरपासून त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या येऊ लागल्या आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या