25.1 C
Latur
Sunday, September 25, 2022
Homeराष्ट्रीयमुख्यमंत्री योगींना ठार मारण्याची धमकी; एकास अटक

मुख्यमंत्री योगींना ठार मारण्याची धमकी; एकास अटक

एकमत ऑनलाईन

लखनौ : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना ठार मारण्याची धमकी देणा-या व्यक्तीला उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केली आहे. लखनौच्या सायबर सेलने आरोपी सरफराजला राजस्थानमधील भरतपूर येथून अटक केली आहे. सफराजने डायल ११२ च्या व्हॉट्सपवर योगी आदित्यनाथ यांना ठार मारण्याची धमकी देणारा मेसेज टाकल्याचा आरोप आहे. याप्रकरणी २ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून पोलिस या प्रकरणाच्या तपासात गुंतले होते.

गुन्हा दाखल झाल्यापासून सायबर टीम सफराजच्या शोधात होती. सायबर टीमने सरफराजला राजस्थानमधील भरतपूर येथून अटक करून लखनौला आणले. लखनौ पोलिस आता सरफराजची चौकशी करीत आहे. सफराजचे वडील डॉक्टर आहे. विशेष म्हणजे शनिवारीही मुख्यमंत्री योगी यांना ठार मारण्याच्या धमक्या आल्या होत्या.

अज्ञात व्यक्तीने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली आहे. हिंदूवादी नेते देवेंद्र तिवारी यांच्या घरावर बॅग फेकून हे धमकीचे पत्र देण्यात आले आहे. देवेंद्र तिवारी यांनी अवैध कत्तलखान्यांबाबत जनहित याचिका दाखल केली आहे. लखनौच्या आलमबाग भागात राहणारे देवेंद्र तिवारी यांना धमकीचे पत्र मिळाले आहे. त्यात त्यांना आणि सीएम योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवले जाईल असे लिहिले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या