भोपाळ : मध्य प्रदेशात पुढील वर्षी होणा-या विधानसभा निवडणुकीपूर्वी आज भाजपमध्ये तीन आमदारांनी प्रवेश केला. समाजवादी पक्षाचे धतरपूरच्या बिजावरमधील आमदार राजेशकुमार शुक्ला, भिंडचे बहुजन समाज पक्षाचे आमदार संजीवसिंह कुशवाहा आणि अपक्ष आमदार विक्रमसिंह राणा यांनी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. कुशवाहा हे पूर्वी भाजपमध्येच होते. त्यांचे वडील रामलखन सिंह पाच वेळा खासदार राहिले आहेत.