24.7 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeराष्ट्रीय३००० किलो ड्रग्ज जप्ती प्रकरणी एनआयएकडून आणखी तिघांना अटक

३००० किलो ड्रग्ज जप्ती प्रकरणी एनआयएकडून आणखी तिघांना अटक

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : गुजरातमधील मुंद्रा बंदरात आढळलेल्या तब्बल ३,००० किलो हेरॉईन्स (ड्रग्ज) प्रकरणी राष्ट्रीय तपास एजन्सीने आणखी तीन जणांना अटक केली आहे. यापूर्वी दोन जणांना दिल्लीतून अटक करण्यात आली होती, त्यामुळे या प्रकरणात आता पाच जणांना अटक झाली आहे.

राह मातुल्लाह, इश्विंदर सिंग आणि जसबीर सिंग अशी अटक झालेल्या या तिघांची नावे आहेत. या तिघांना १४ सप्टेंबर रोजी अशाच प्रकारे समुद्रामार्गे विविध कंटेनरमधून ड्रग्जच्या खेप आणल्याप्रकरणी अटक झाली होती. त्यांची कसून चौकशी झाल्यानंतर मुंद्रा ड्रग्ज प्रकरणातही त्यांचा सहभाग असल्याचे उघड झाले आहे.

दरम्यान, यापूर्वी २६ ऑगस्ट २०२२ रोजी एनआयएने दिल्लीतील २० विविध ठिकाणी टाकलेल्या छाप्यांमध्ये दोन जणांना अटक झाली होती. हरप्रीत सिंग तलवार ऊर्फ कबीर तलवार, प्रिन्स शर्मा शी या दोघांची नावे आहेत. हे दोघेही ड्रग्ज तस्करीतील आंतरराष्ट्रीय टोळीतील लोक आहेत. त्यांनी अफगाणिस्तानातून मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज भारतात आणले होते, अशी माहिती एनआयएने त्यावेळी दिली होती.

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या