कोटा : राजस्थानमधल्या कोटामध्ये एका प्रियकराने आपल्या प्रेयसीला खूश करण्यासाठी एक अजब प्रकार केला आहे. हा प्रकार पाहून पोलिसही अचंबित झाले आहेत. आपल्या मित्रासोबत त्याने तीन जणांना चक्क लुटले आहे.
या विचित्र स्वभावाच्या प्रियकराने एक डिलीव्हरी बॉय, पेट्रोल पंपावरचा कर्मचारी आणि एका भाजीवाल्याला लुटले आहे. यामध्ये त्याने त्याच्या मित्राचीही मदत घेतली आहे. आपल्या प्रेयसीचा गहाण ठेवलेला लॅपटॉप सोडवण्यासाठी या तरुणाने चाकूचा धाक दाखवत अशा प्रकारे लूट केल्याची माहिती मिळत आहे.