28.3 C
Latur
Friday, June 25, 2021
Homeराष्ट्रीयकुवेतवरून २१५ टन ऑक्सिजन घेऊन तीन युद्धनौका रवाना

कुवेतवरून २१५ टन ऑक्सिजन घेऊन तीन युद्धनौका रवाना

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारतातील ऑक्सिजनचा तुटवडा भरुन काढण्यासाठी आता कुवेत देश मदतीला धावून आला आहे. कुवेतने २१५ टन द्रव्य स्वरुपातील ऑक्सिजन पाठवला आहे. आज चार जहाज कुवेतहून भारतासाठी रवाना झाली आहेत. येत्या शनिवारपर्यंत भारतात हा ऑक्सिजन दाखल होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, भारतासाठी येत्या तीन आठवड्यांमध्ये एकूण १,४०० टन ऑक्सिजन पाठवण्याची तयारी कुवेतने दाखवली आहे.

कुवेतच्या मदतीमुळे भारतातील ऑक्सिजन तुटवडा भरुन निघण्यास फार मोठी मदत होणार आहे. भारतीय नौदलानंही द्रव्य स्वरुपातील ऑक्सिजन, मेडिकल साहित्य आणि इतर महत्वाच्या वस्तू आणण्यासाठी आपली ९ लढाऊ जहाजे विविध देशांमध्ये पाठवली आहेत. त्यातील तीन जहाज कुवेतला ऑक्सिजन आणण्यासाठी पाठवण्यात आली होती.

भारतीय नौदलातील तीन युद्धनौका आणि व्यावसायिक जहाजं कुवेतहून एकूण २१५ टन ऑक्सिजन घेऊन निघाली आहेत. मुंबई आणि गुजरातमधील बंदरांवर शनिवारपर्यंत ती पोहोचतील, अशी माहिती कुवेतचे राजदूत जसेम इब्राहिम अल नजीम यांनी सांगितले.

आणखी ऑक्सिजन आणण्याची नौदलाची तयारी
केवळ २१५ टन नव्हे, तर युद्धनौका पुन्हा कुवेतला रवाना होऊन येत्या काळात आणखी ऑक्सिजन आणण्याची नौदलाची तयारी आहे. तसेच कुवेतनेही १४०० टन ऑक्सिजनचा पुरवठा करण्याची तयारी दाखवली आहे, असेही इब्राहिम अल नजीम यांनी सांगितले.

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा कोरोनाने मृत्यू

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
202FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या