22.8 C
Latur
Saturday, October 1, 2022
Homeराष्ट्रीयजादूूटोण्याच्या संशयावरून तीन महिलांची हत्या

जादूूटोण्याच्या संशयावरून तीन महिलांची हत्या

एकमत ऑनलाईन

रांची : झारखंडमधील रांची जिल्ह्यातील गावात तिहेरी हत्याकांडाची खळबळजनक घटना समोर आली आहे. जादूटोणा करीत असल्याच्या संशयावरून तीन महिलांना बेदम मारहाण करण्यात आली. यात तिन्ही महिलांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी आठ जणांना अटक केली आहे.

सोनहपुत पोलिस ठाण्यांतर्गत रांडीह गावात झालेल्या हत्येप्रकरणी महिलेचा पती आणि मुलासह १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंत आठ जणांना अटक केली आहे तर उर्वरितांचा शोध सुरू आहे, असे वरिष्ठ पोलिस अधीक्षक (एसएसपी) कौशल किशोर यांनी मंगळवारी सांगितले. गावातील काही लोकांनी तीन महिलांना काठ्यांनी मारहाण केली. या तिन्ही महिला जादूटोणा करीत असल्याचा त्यांना संशय होता. महिलांच्या मृत्यूनंतर मृतदेह या लोकांनी गावाजवळील डोंगराळ भागात फेकून दिले. रविवारी दोन मृतदेह सापडले, तर तिसरा मृतदेह सोमवारी सापडला असे पोलिसांनी सांगितले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या