30.9 C
Latur
Monday, May 10, 2021
Homeराष्ट्रीयतीन दहशतवाद्यांना कंठस्रान; ४८ तासांत १० अतिरेक्यांचा खात्मा

तीन दहशतवाद्यांना कंठस्रान; ४८ तासांत १० अतिरेक्यांचा खात्मा

एकमत ऑनलाईन

श्रीनगर : जम्मू काश्मिरमधील शोपिया सेक्टरमधील हाडीपोरा येथे दहशतवाद्यांविरोधात भारतीय लष्कराने मोठी कारवाई केली. शनिवारी सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली. दुपारी सुरू झालेल्या धुमश्चक्रीत जवानांनी तीन दहशतवाद्यांना कंठस्रान घातले. मागील ४८ तासांत लष्कराने हाती घेतलेल्या मोहिमेत १० दहशतवादी ठार झाले.

जम्मू काश्मिरमध्ये लष्कराने दहशतवादविरोधी मोहीम हाती घेण्यात आलेली आहे. शनिवारी दुपारी शोपियातील हाडीपोरात लष्कराने शोधमोहीम हाती घेतली होती. यावेळी दहशतवादी जवानांमध्ये चकमक सुरू झाली. दुपारपासून रात्री उशिरापर्यंत गोळीबार होता. या कारवाईत तीन दहशतवादी ठार झाले. दहशतवादी संघटनेत नव्यानं दाखल झालेल्या तरुणाचे मतपरिवर्तन करून शरण येण्याचे आवाहन जवानांकडून करण्यात आले. त्याचबरोबर तरुणाच्या वडिलांनीही त्याला शरण येण्यासाठी विनवणी केली. मात्र, त्याच्या सहका-यांनी त्याला शरण येण्यापासून रोखले, असे काश्मीर पोलिसांनी म्हटले आहे.

ठार झालेले तिन्ही दहशतवादी अल बद्री संघटनेशी संबंधित होते अशी माहिती पोलिसांनी दिली. या चकमकीनंतर सुरक्षा जवानांची परिसरात शोधमोहीम सुरूच आहे. लष्करांकडून सुरू असलेल्या दहशतवादविरोधी मोहिमेत गेल्या ४८ तासांत १० दहशतवादी ठार झाले आहेत. पुलवामात केलेल्या कारवाईत दोन दहशतवादी ठार झाले होते. तर दक्षिण काश्मिरमध्ये तब्बल चार ठिकाणी सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमकी उडाल्या आहेत.

दिल्लीचा विजय, चेन्नईला धक्का

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,494FansLike
184FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या