28.3 C
Latur
Friday, June 25, 2021
Homeराष्ट्रीयटिकटॉक : गोपनीयता आणि अखंडता यालाच आम्ही प्राधान्य देतो

टिकटॉक : गोपनीयता आणि अखंडता यालाच आम्ही प्राधान्य देतो

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारने टिकटॉक, शेयर इट यांसारख्या लोकप्रिय अ‍ॅपसह जवळपास ५९ App वर अधिकृत बंदी घालत चीनवर डिजिटल स्ट्राईक केल्याची चर्चा होत आहे. गेल्या काही दिवसांपासून या दोन्ही देशांमध्ये वाढणारा तणाव या अ‍ॅप वरील बंदी साठी खतपाणी घालून गेला. सुरक्षेच्या दृष्टीनं आणि अर्थातच चीनच्या मुजोरीला धडा शिकवण्यासाठी म्हणून हा निर्णय घेतला गेल्याची जोरदार चर्चा आहे. असं असतानाच बंदीचा निर्णय येताच अवघ्या काही तासांमध्ये आता टिकटॉक इंडियाकडून काही महत्त्वाच्या गोष्टी स्पष्ट करण्यात आल्या आहेत.

टिकटॉक च्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन आपण चीनच्या सरकारला कोणत्याही प्रकारची माहिती दिली नसल्याचं या निवेदनात म्हटलं आहे. ‘भारत सरकारनं जारी केलेल्या ५९ अ‍ॅप ब्लॉक करण्याच्या अंतरिम आदेशामध्ये टिक टॉकचाही समावेश आहे. आम्ही या आदेशाचं पालन करत आहोत. सदर प्रकरणी आम्हाला सरकारी अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीचं बोलावणं आलं आहे. जेथे आमची बाजू मांडत स्पष्टीकरण देण्याची संधी मिळणार आहे. संरक्षित बाबी आणि डेटा प्रायव्हसीबाबतच्या सर्व अधिनियमांचं टिक टॉकनं पालन केलं असून आमच्याकडून कोणत्याही प्रकारची माहिती परदेशी आणि चिनी सरकारला देण्यात आलेली नाही. भविष्यातही असं केलं जाणार नाही. अ‍ॅपच्या वापरकर्त्यांची गोपनीयता आणि अखंडता यालाच आम्ही प्राधान्य देतो’, असं निखिल गांधी यांच्या नावे प्रसिद्ध करण्यात आलेल्या या निवेदनात स्पष्ट करण्यात आलं.

Read More  तुझा विसर न व्हावा…..पांडुरंगा !

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
202FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या