22.4 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeराष्ट्रीयतिरुपती मंदिरास ५० लाखांचा दंड

तिरुपती मंदिरास ५० लाखांचा दंड

एकमत ऑनलाईन

चेन्नई : तिरुपती बालाजी मंदिर कोणत्या ना कोणत्यातरी कारणाने नेहमी चर्चेत असते. मात्र, आता वेगळेच प्रकरण समोर आले आहे. भक्ताला १४ वर्षांसाठी वाट पाहायला लावणा-या तिरुपती मंदिर संस्थानाला ग्राहक न्यायालयाने ५० लाखांचा दंड ठोठावला आहे.

तामिळनाडूच्या सलेम येथील ग्राहक न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. तामिळनाडूतील भक्त के. आर. हरि भास्कर यांनी तिरुपती मंदिरात वस्त्रालंकार सेवा देण्यासाठी तारीख मागितली होती. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांना तारीख मिळत नव्हती. कोरोना महामारीमुळे २०२० मध्ये ८० दिवस मंदिर बंद होते. त्यामुळे मंदिरात होणारी वस्त्रालंकारासह अनेक सेवा बंद ठेवण्यात आल्या होत्या.

तिरुपती संस्थान कोणता निर्णय घेणार?
याच दरम्यान भास्कर यांच्या सेवेची तारीख होती. पण, सेवा बंद राहिल्यामुळे त्यांना सेवा देता आली नाही. त्यामुळे भास्कर यांना संस्थानाने पत्र पाठवले. या पत्रात मंदिराने भास्कर यांना विशेष दर्शनासाठी तारीख हवी असल्यास किंवा पैशांचा परतावा हवा असल्यास कळवण्यास सांगितले होते. तेव्हा भास्कर यांनी वस्त्रालंकार सेवेसाठी तारीख देण्याची विनंती केली.

भास्कर यांनी ग्राहक न्यायालयात मागितली दाद
संस्थानाने त्यांना सेवेची तारीख न देता पैसे परत घेण्यास सांगितलं. त्यामुळं भास्कर यांनी ग्राहक न्यायालयात दाद मागितली. ग्राहक लवादानं तिरुपती मंदिर संस्थानाला वस्त्रालंकार सेवा देण्यासाठी एक वर्षाच्या आत नवीन तारीख द्या, अन्यथा ५० लाख रुपये दंड भरपाई म्हणून भास्कर यांना देण्याचे आदेश दिलेत. त्यामुळे संस्थान कोणता निर्णय घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या