26.9 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeराष्ट्रीयकेंद्राविरोधात टीएमसी विधानसभेत आणणार ठराव

केंद्राविरोधात टीएमसी विधानसभेत आणणार ठराव

एकमत ऑनलाईन

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये सत्तेत असलेल्या तृणमूल काँग्रेसने, केंद्रीय तपास यंत्रनेचा गैर वापर होत असल्याचा आरोप वारंवार केला आहे. याच्या विरोधात बंगाल विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात प्रस्तावावर विचार करणार आहे. टीएमसीचा आरोप आहे की, केंद्र सरकार सत्ता परिवर्तनासाठी तपास यंत्रनेचा गैरवापर करत आहे.

बंगाल विधानसभेचे पावसाळी अधिवेशन १४ ते २२ सप्टेंबरला होणार आसल्याचे सांगितले जाते. या अधिवेशनात केंद्राच्या विरोधात प्रस्ताव आणला जावू शकतो. राज्याचे संसदीय कार्यमंत्री शोभनदेव चट्टोपाध्याय म्हणाले, या सत्रात काही प्रस्तावांवर चर्चा झाली आहे. पुढच्या काही दिवसात या प्रस्तावावर निर्णय घेतला जावू शकतो, त्यानंतर पुढील आठवड्यात होणा-या बैठकीत हा प्रस्ताव सभागृहाच्या सल्लागार समितीसमोर ठेवला जाईल.

टीएमसीच्या काही सुत्रांनी सांगितले आहे की, केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर राजकीय हत्यार म्हणून वापर करणा-यांविरोधात ठराव आणण्याची योजना आखली जात आहे. टीएमसीच्या एका ज्येष्ठ आमदाराने सांगितले की, भाजप केवळ पश्चिम बंगालमध्येच नाही तर सर्व विरोधी शासित राज्यांमध्ये सीबीआय आणि ईडीचा गैरवापर करत आहे. भाजप नेत्यांवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांकडे या यंत्रणेचे लक्ष नाही.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या