20.8 C
Latur
Saturday, September 18, 2021
Homeउद्योगजगतजीडीपीचा वृध्दीदर उंचावणार; भारतीय अर्थव्यवस्थेसाठी ‘अच्छे दिन’चे संकेत

जीडीपीचा वृध्दीदर उंचावणार; भारतीय अर्थव्यवस्थेसाठी ‘अच्छे दिन’चे संकेत

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारताच्या जीडीपीचा वृध्दीदर उंचावणार असून, आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये भारताचे राष्ट्रीय सकल उत्पन्न (जीडीपी) ९.३ टक्क्यांनी वाढणार असल्याचे तसेच, पुढील आर्थिक वर्षात म्हणजेच २०२३ चे आर्थिक वर्ष संपताना जीडीपी वृद्धीचा दर ७.९ टक्के इतका असेल, असे अंदाज अमेरिकी पतमानांकन संस्था ‘मूडीज इनव्हेस्टर्स सर्विसेस’ने मंगळवार दि़ १ जून रोजी व्यक्त केला़

कोरोनाच्या दुस-या लाटेमध्ये भारतातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये लागू करण्यात आलेल्या लॉकडाउन आणि निर्बंधांचा फारसा गंभीर परिणाम अर्थव्यवस्थेवर होणार नसल्याचा अंदाज मूडीजने व्यक्त केला आहे. मागील वर्षी लॉकडाउनमुळे अर्थव्यवस्थेला जितका फटका बसला़ त्या तुलनेत यंदा फार मोठा फटका बसणार नसल्याचे दिलासादायक भाकित मूडीजने व्यक्त केले आहे़ एकंदरितच मूडीजच्या सध्याच्या अहवालामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेसाठी ‘अच्छे दिन आने वाले है’, असे संकेत मिळाले आहेत.

दरम्यान देशात अनेक राज्यांनी सतर्कतेचा इशारा म्हणून निर्बंध १५ जूनपर्यंत वाढवले आहेत. मात्र असे असले तरी उत्पादन, निर्मिती क्षेत्रांशी संबंधित उद्योग आणि व्यवसाय सुरु असल्याने मागील वर्षीच्या तुलनेत यंदा अर्थव्यवस्थेला कमी प्रमाणात फटका बसला आहे. मूडीजच्या अहवालानुसार एप्रिल-जूनच्या तिमाहीमध्ये आर्थिक घडामोडी मंदावल्याने अर्थव्यवस्थेची पडझड झाली. मात्र यानंतर अर्थव्यवस्था भरारी घेईल आणि सध्या सुरु असणाºया आर्थिक वर्षात प्रत्यक्ष आणि महागाईच्या दृष्टीने विचार करुन निर्धारित केलेली जीडीपी वृद्धी ९.३ टक्के असेल. त्याचबरोबर पुढील आर्थिक वर्षात जीडीपीमध्ये ७.९ टक्के वाढ होईल. मूडीजच्या अंदाजानुसार दिर्घकालीन विचार केल्यास प्रत्यक्ष जीडीडी वाढ ही सरासरी ६ टक्क्यांच्या आसपास राहील.

विकासदराचा नीचांक
सोमवारीच राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार भारतीय अर्थव्यवस्थेने गेल्या ४० वर्षांतील निराशाजनक कामगिरी केली आहे. करोनाच्या संकटाने मोठा तडाखा बसलेल्या भारताचा २०२०-२१ या आर्थिक वर्षांतील विकास दर (सकल राष्ट्रीय उत्पादन) उणे (-) ७.३ टक्के नोंदवला गेलाय. चाळीस वर्षांपूर्वी म्हणजे १९७९-८० या वर्षांत आर्थिक विकासदराची उणे ५.२ टक्के घसरण झाली होती. त्यानंतर प्रथमच विकासदर उणे ७.३ टक्क्यांवर घसरला आहे. देशाचा विकास दर दुहेरी संख्या गाठण्याची अपेक्षा खुद्द सरकारनेही सोडून दिली होती.

जून २०२० मध्ये उणे २४़४ टक्क्यांची नोंद
देशात कोरोना साथीचा उद्रेक मार्च २०२० मध्ये झाला. परिणामी गेल्या वर्षी देशव्यापी लॉकडाऊन लागू झाली. सप्टेंबर २०२० मध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होण्याआधीच अर्थविकास दर उणे स्थितीत आला. कठोर लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यातच म्हणजे एप्रिल ते जून २०२० दरम्यान विकास दर थेट उणे २४.४ टक्के नोंदला गेला होता, तर तिसºया तिमाहीत तो शून्यावर आला. चौथ्या तिमाहीत त्याने १.६ टक्क्याच्या रूपात थोडी उभारी घेतली होती. २०२०-२१ या आर्थिक वर्षांतील उणे विकास दर हा राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या उणे ८ टक्के आणि रिझव्­र्ह बँकेच्या उणे ७.५ टक्के अंदाजानजीक आहे. अर्थवेगाच्या गेल्या चारपैकी तीनही तिमाही उणे स्थितीत गेल्या आहेत.

विकासदराची टक्केवारी
२०२०-२१ आर्थिक वर्ष : उणे ७.३ टक्के
जानेवारी-मार्च २०२१ : १.६ टक्के वाढ
ऑक्टोबर-डिसेंबर २०२० : ०.४ टक्के वाढ
जुलै – सप्टेंबर २०२० : उणे ७.३ टक्के
एप्रिल-जून २०२० : उणे २४.४ टक्के

रोज १ कोटी डोसचा प्रयत्न

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या