28.1 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeराष्ट्रीयशेअर बाजारासाठी आज 'ब्लॅक मंडे

शेअर बाजारासाठी आज ‘ब्लॅक मंडे

एकमत ऑनलाईन

मुंबई : शेअर बाजारासाठी आजचा दिवस हा ‘ब्लॅक मंडे’ ठरला असून गुंतवणूकदारांना मोठ्या नुकसानीला सामोरं जावं लागलं. आज शेअर बाजार बंद होताना राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये ८६१ अंकांची घसरण झाली. तर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये २४६ अंकांची घसरण झाली. आज सेन्सेक्समध्ये १.४६ टक्क्यांची घसरण होऊन तो ५७,९७२ अंकांवर पोहोचला. तर निफ्टीमध्ये १.४० टक्क्यांची घसरण होऊन तो १७,३१२ अंकांवर पोहोचला. बँक निफ्टी इंडेक्सही ७१० अंकांनी घसरला असून तो ३८,२७६ अंकांवर पोहोचला आहे. जागतिक पातळीवर शेअर बाजारात सुरू असलेल्या घसरणीचा परिणाम भारतीय शेअर बाजारात दिसून आला.

आज एकूण १४१४ कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली, तर १९८९ कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली. २०५ कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही. आज निफ्टीमध्ये घसरण झाली. बीएसई स्मॉलकॅप आणि मिडकॅपमध्ये ०.५ टक्क्यांची घसरण झाली.

ऑईल अ‍ॅन्ड गॅस आणि एफएमसीजी ही क्षेत्रं वगळता इतर सर्वच क्षेत्रातल्या शेअर्समध्ये घसरण झाली. बँका, आयटी, मेटल, सार्वजनिक बँका आणि रिअ‍ॅलिटी क्षेत्रातल्या शेअर्समध्ये एक ते तीन टक्क्यांची घसरण झाली.

रुपयाची घसरण
डॉलरच्या तुलनेत आज रुपयाची ९ पैशांनी घसरण झाली आहे. आज रुपयांची किंमत ७९.९६ रुपये इतकी आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाची वाटचाल आता ८० कडे सुरू आहे.

शेअर बाजाराची सुरुवात घसरणीने
भारतीय शेअर बाजाराची सुरुवात मोठ्या पडझडीने झाली आहे. बाजारातील व्यवहार सुरू होताच मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स १२०० अंकांनी घसरला. प्री-ओपनिंग सत्रात सेन्सेक्समध्ये १२०० अंकांची घसरण झाली होती. तर निफ्टीमध्ये ३७० अंकांची घसरण दिसून आली होती. सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स १०६९ अंकांच्या घसरणीसह ५७,७५३.६१ अंकांवर व्यवहार करत होता. तर, निफ्टी ३१४ अंकांच्या घसरणीसह १७,२४४.४५ अंकांवर व्यवहार करत होता.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या