31.3 C
Latur
Saturday, May 8, 2021
Homeराष्ट्रीयआधी अनुत्तीर्ण नंतर एसटी प्रवर्गातून देशात अव्वल

आधी अनुत्तीर्ण नंतर एसटी प्रवर्गातून देशात अव्वल

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : राष्ट्रीय वैद्यकीय प्रवेश परीक्षेचा (नीट) निकाल नुकताच जाहीर झाला. दरम्यान, या निकालात झालेली एक मोठी चूक समोर आली आहे. ही परीक्षा दिलेल्या मृदुल रावत या विद्यार्थ्यास एनटीएकडून देण्यात आलेल्या मार्कशीटमध्ये तो नापास झाल्याचे दाखवण्यात आले होते़ मात्र तो एसटी कॅटेगरीत देशात पहिला आलेला होता. ही चूक पुन्हा तपासणी करण्यात आल्यानंतर उघड झाली.

नीट परीक्षेत नापास झाल्याचे दाखवण्यात आल्यानंतर या विद्यार्थ्याने निकालावर आक्षेप घेत, ओएमआर शीट आणि उत्तरपत्रिकांच्या आधारावर निकालाला आव्हान दिले. त्यानुसार पुन्हा तपासणी करण्यात आल्यावर तो एसटी कॅटेगरीत देशात अव्वल असल्याचे समोर आले.

मृदुलने म्हटले की, एनटीएच्या निकालातील माझ्या गुणांनुसार आपण नीट २०२० परीक्षेत नापास झालो होतो. या गुणांसह कोणतेही वैद्यकीय महाविद्यालय मिळणार नव्हते. यामुळे आपल्याला अक्षरश: रडू येत होते व आपण नैराश्यात गेलो होतो. कारण आपल्याला खात्री होती की आपण नीट परीक्षा ६५० गुणांसह उत्तीर्ण होणारच. परंतू हा निकाल पाहिल्यानंतर आपल्याला मोठा धक्काच बसला. यानंतर आपण एटीएच्या निकालाला आव्हान दिले व पुन्हा तपासणी झाल्यावर खरा निकाल समोर आला. एनटीएने चूक मान्य केल्याने आपण आनंदी आहे. मी ६५० गुणांसह एसटी कॅटेगरीत देशात अव्वल आहे. तर, सर्वसाधरण श्रेणीत माझा देशात ३५७७ वा क्रमांक आहे.

शेतक-यांच्या मदतीसाठी शासनाकडे पाठपुरावा : खा.पाटील

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या