22.5 C
Latur
Friday, July 30, 2021
Homeराष्ट्रीयपरंपरा आणि विज्ञान हीच भारताची ताकद

परंपरा आणि विज्ञान हीच भारताची ताकद

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : परंपरा आणि विज्ञान हीच भारताची खरी ताकद असल्याचे प्रतिपादन गुरुवार दि़ २४ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हीडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून टॉयकॅथन २०२१ ला संबोधित करताना केले. विविध क्रीडा प्रकाराला चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्नशील असतात. विविध क्रीडा प्रकारात जागृकता निर्माण व्हावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेकदा खेळाडूंना प्रोत्साहितही केले आहे.

आता खेळण्याच्या उद्योगाला चालना देण्यासाठी पंतप्रधान मोदी सरसावले आहेत. देशभरातील विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग दर्शवला होता. यावेळी मोदी यांनी जंक फूडचे फायदे आणि नुकसान यावरही सविस्तर चर्चा केली. शाळा हेच मुलांचे पहिले कुटुंब असते. त्याचप्रमाणे खेळ आणि पुस्तक त्यांचे मित्र असतात. तसेच लहानग्यांमधील कुपोषण कसे दूर करता येईल, हेही सांगितले. ते म्हणाले की, मुले पौष्टिक खाणे टाळतात. जंक फूड अतिप्रमाणात खातात.

त्यामुळेच कुपोषणाचे प्रमाण वाढले आहे. अशा परिस्थितीत खेळातूनचे त्यांना सतर्क केले जाऊ शकते. यासाठी योग्य त्या साधनांचा वापर करुन परंपरेप्रमाणे नवीन गेम्स तयार करता येऊ शकतात. परंपरा आणि विज्ञान हीच भारताची खरी ताकद आहे.

कोरोनामुळे दोन कुख्यात नक्षलवाद्यांचा मृत्यू

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या