21.4 C
Latur
Tuesday, July 27, 2021
Homeमनोरंजन'ट्रॅजेडी किंग' दिलीप कुमार काळाच्या पडद्याआड; वयाच्या ९८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

‘ट्रॅजेडी किंग’ दिलीप कुमार काळाच्या पडद्याआड; वयाच्या ९८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

एकमत ऑनलाईन

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे निधन झाले आहे. ते ९८ वर्षांचे होते. मुंबईतील हिंदुजा रुग्णालयाचे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दिलीप कुमार यांना श्वासोच्छवासाचा त्रास होत होता. यामुळे त्यांना हिंदुजामध्ये गेल्या महिन्यात दाखल करण्यात आले होते. यांच्यावर मुंबईतल्या हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरू होते.

उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज देखील देण्यात आला होता. परंतु पुन्हा एकदा त्रास सुरू झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. या दरम्यान त्यांच्या निधनाच्या अनेक वेळा अफवा आल्या. परंतु प्रत्येक वेळी त्यांच्या पत्नी सायरा बानो या निधनाचे वृत्त फेटाळत त्यांची प्रकृती अगदी व्यवस्थित असल्याचे सांगत आजची सकाळ दिलीप कुमार यांच्या चाहत्यांसाठी आणि चित्रपटसृष्टीसाठी वाईट उगवली. आज सकाळी दिलीप कुमार यांनी अखेरचा श्वास घेतला.

मोहम्मद युसुफ खान यांचा जन्म पेशावर येथे ११ डिसेंबर १९२२ रोजी झाला होता. त्यांचे मुळ नाव मोहम्मद युसुफ खान होते. त्यांचे शिक्षण नाशिक येथे झाले. राजकपूरशी त्यांची लहानपणापासून मैत्री झाली होती. तेथूनच दिलीपकुमार यांचा बॉलीवूड प्रवास सुरु झाला. वयाच्या २२ व्या वर्षी त्यांना पहिली फिल्म मिळाली.

पाच दशकांहून अधिक बॉलिवूड करिअरमध्ये दिलीप कुमार यांनी मुगल-ए-आजम, देवदास, नया दौर, राम और श्याम असे अनेक सुपरहिट चित्रपट दिले. त्यांनी ज्वार भाटा या सिनेमातून १९४४ मध्ये सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. सामान्य माणसाच्या आयुष्यातील दुःख दिलीप कुमार यांनी त्यांच्या अभिनयातून उतरवलं आणि पुढची अनेक वर्षे रसिकांच्या मनावर अधिराज्य केले. बाबूल, दीदार, आन, गंगा-जमुना, मधुमती, देवदास अशा अनेक सिनेमांमधून त्यांनी काम केले होते. १९९८ मध्ये आलेला किला हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला.

पद्मभूषण व दादासाहेब पुरस्काराने सन्मानित
सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी त्यांना ८ वेळा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. हिंदी चित्रपटसृष्टेचा सर्वोच्च सन्मान दादासाहेब फाळके पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. २०१५ मध्ये सरकारने त्यांना पद्मभूषण हा देशाचा दुसरा सर्वोच्च सन्मानही दिला.

दोन भाऊ कोरोनामुळे मरण पावले
यापूर्वी कोरोनामुळे गेल्या वर्षी दिलीपकुमारचे दोन धाकटे भाऊ मरण पावले होते. २१ ऑगस्ट रोजी अस्लम वय ८८ वर्ष आणि त्यानंतर २ सप्टेंबर रोजी एहसान वय ९० यांचे वर्षांचे निधन झाले. यामुळे, सायरा बानो आणि दिलीप कुमार यांनी ११ ऑक्टोबरला आपली ५४ वा विवाहसोहळा साजरा केला नाही.

सार्वजनिक मंडळाकरिता ४ फूट तर घरगुती गणपतीची मुर्ती २ फुटाची

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
199FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या