24.4 C
Latur
Monday, September 20, 2021
Homeराष्ट्रीयजास्त बोलल्यास अनंतनागमध्ये ट्रान्सफर

जास्त बोलल्यास अनंतनागमध्ये ट्रान्सफर

एकमत ऑनलाईन

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये भाजपला पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर ममता बॅनर्जी यांच्याविरोधात निवडणुकीत जिंकलेल्या सुवेंदू अधिकारी यांना विरोधी पक्षनेता बनवण्यात आले. मात्र, भाजपचा झालेला पराभव सुवेंद अधिका-यांना पचलेला दिसत नाही. कारण, काही नेत्यांच्या अती आत्मविश्वासामुळे भाजप पराभूत झाला, या शब्दांत अधिकारी यांनी पक्षाला घरचा अहेर दिला होता. आता मिदनापूरचे पोलिस अधिक्षक यांना जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला किंवा अनंतनागमध्ये बदली करण्याची धमकी सुवेंदू अधिका-यांनी दिल्याचे सांगितले जात आहे.

ममता बॅनर्जी सरकार भाजप कार्यकर्त्यांना खोट्या आरोपांखाली फसवण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप सुवेंदू अधिका-यांनी केला आहे. तसेच आपल्याविरोधात सुरू असलेल्या चौकशीवर नाराजी व्यक्त करत मिदनापूरच्या पोलिस अधिक्षकांना धमकवल्याचे सांगितले जात आहे. तुम्हाला तुमची बदल जम्मू काश्मीरमधील अनंतनाग किंवा बारामुल्ला भागात व्हावी, असे वाटत नसेल, तर काहीही करू नका, अन्यथा धडा शिकवला जाईल, असा इशारा अधिकारी यांनी दिल्याचे सांगितले जात आहे.

भाजप ओबीसी मोर्चाच्या बैठकीला पंकजा मुंडे, बावनकुळे गैरहजर

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या