16.8 C
Latur
Thursday, December 1, 2022
Homeराष्ट्रीयगुजरातमध्ये कॉंग्रेसची परिवर्तन संकल्प यात्रा

गुजरातमध्ये कॉंग्रेसची परिवर्तन संकल्प यात्रा

एकमत ऑनलाईन

गांधीनगर : गुजरातमध्ये काही दिवसांनी विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. त्यासाठी भाजपा आणि आप पक्षाकडून जोरदार प्रचार करण्यात येत आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह सातत्याने गुजरातचा दौरा करीत आहेत, तर आपचे सर्वेसर्वा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालही गुजरातमध्ये आश्वासनांची खिरापत वाटत आहेत. त्यामध्ये काँग्रेस पक्ष मागे पडल्याचे दिसत होते. त्यातच काँग्रेसने राज्यात ‘परिवर्तन संकल्प यात्रा’ काढणार असल्याचे जाहीर केले आहे.

१८२ विधीमंडळ सदस्य असलेल्या गुजरात विधासनसभा निवडणुकीची घोषणा अद्याप झाली नाही. पण गुजरातमध्ये वातावरण निर्मितीसाठी काँग्रेसने ‘भारत जोडो’च्या धर्तीवरच ‘परिवर्तन संकल्प यात्रे’ची घोषणा केली आहे. ३१ ऑक्टोंबरपासून या यात्रेला सुरुवात होणार आहे.

गुजरात काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते मनीष दोशी म्हणाले, छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह आणि कमलनाथ, ज्येष्ठ नेते मुकुल वासनिक या पाच नेत्यांवर ‘परिवर्तन संकल्प यात्रे’ची जबाबदारी सोपावण्यात आली आहे. हे नेते वेगवेगळ््या शहरातून ‘परिवर्तन संकल्प यात्रे’ला सुरुवात करतील. गेहलोत गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यातील पालनपूर येथून यात्रेला सुरुवात करतील. भूपेंद्र बघेल खेडा जिल्ह्यातील फागवेल, दिग्विजय सिंह कच्छमधील नखतरणा, कमलनाथ सोमनाथ येथून तर, ज्येष्ठ नेते मुकुल वासनिक हे जंबुसर ते दक्षिण गुजरात येथील ‘परिवर्तन संकल्प यात्रे’ला उपस्थित राहतील.

 

 

 

 

 

 

 

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या