30.1 C
Latur
Tuesday, February 7, 2023
Homeराष्ट्रीयप्रेमाच्या जाळ्यात ९ जणांना अडकवले

प्रेमाच्या जाळ्यात ९ जणांना अडकवले

एकमत ऑनलाईन

चंदीगड : हरियाणातील गुरुग्राममध्ये राहणा-या एका महिलेने एका व्यक्तीवर बलात्काराचा आरोप केला. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीची कारागृहात रवानगी केली. काही दिवसांनी परत महिलेने दुस-या एका व्यक्तीवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला. त्या आरोपीचीही तुरुंगात रवानगी करण्यात आली.

अशाप्रकारे महिलेनं एकामागून एक अशा ९ पुरुषांना लक्ष्य केले. महिलेने त्यांच्यावर बलात्काराचा आरोप केला आणि बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याच्या नावाखाली त्यांच्याकडून पैसे उकळले. तपासाअंती पोलिसांनी महिलेविरुद्ध कागदपत्रे गोळा करून तिची कारागृहात रवानगी केली. यानंतर या महिलेने पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. बुधवारी झालेल्या सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाच्या खंडपीठानंही महिलेचा जामीन अर्ज फेटाळून लावला.

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या