31.8 C
Latur
Tuesday, May 11, 2021
Homeराष्ट्रीयनागालँडमध्ये सापडले हि-यांचे भांडार?

नागालँडमध्ये सापडले हि-यांचे भांडार?

पर्वतावर प्रशासनाची तपासणी सुरू

एकमत ऑनलाईन

वांचिंग : हिरा खूपच मौल्यवान असून दागिन्यांच्या दुकानात हिरा घ्यायला गेल्यानंतर खूप पैसै मोजावे लागतात. सर्वसामान्य लोक हिरा घेण्याचा विचारही करू शकत नाहीत. पण अशा मौल्यवान वस्तू मोफत किंवा खोदकाम करताना मिळाल्या तर जणूकाही जॅकपॉटच लागतो. नागालँडच्या मौन जिल्ह्यात अशीच एक घटना घडली आहे. वांचिंग नावाच्या या गावात खोदकाम करत असताना मजूरांना हिरे सापडले आहेत.

गावातील लोकांना या प्रकाराची जशी माहिती मिळाली तसे ते लोक त्या ठिकाणी कुदळ आणि फावडा घेऊन पोहोचले. अजून हिरे मिळतील या भावनेने खोदायला सुरूवात केली. चमकणारी दगडे मिळालेली असून हा हिरा आहे की नाही याबाबत माहिती मिळालेली नाही. म्यानमार बॉर्डरला लागून असलेले नागालँड वांचिंग गावातील ही घटना असून या खोदकामाचे फोटोज व्हायरल होत आहे. यामध्ये खोदकाम करून चमत्कारीक दगड मिळत आहेत.

रिपोर्ट्सनुसार गावातील लोक चमकणारे दगड घेऊन गेले आहेत. काही दिवसांपूर्वी अशी अफवा उडाली होती की, गावाच्या पर्वतांवर हि-यांची खाण आहे. त्यानंतर सगळ्यांनी खोदकाम करायला सुरूवात केली. सोम गावामधून समोर आलेल्या माहितीनुसार काही लोकांना अशी दगडे हिरे आहेत की नाहीत याबाबत माहिती मिळालेली नाही. या दगडांच्या गुणवत्तेची तपासणी केलेली नाही.

सोम या डिप्टी कमिश्नर थवलेसन यांनी सांगितले की, आता या पर्वतांमधून काही दगड मिळाले आहेत. सध्या या ठिकाणाची अधिका-यांकडून तपासणी केली जात आहे. नागालँडच्या भूविज्ञान आणि उत्खनन विभागाचे लोक त्या ठिकाणी पोहोचले. करंट सायंसेसमध्ये इंडो-जर्मनमधील एका अभ्यासानुसार या ठिकाणी सुक्ष्म हि-यांची खाण असू शकते.

कोविशिल्ड लस परिणामकारकच!

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,494FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या