36.1 C
Latur
Saturday, April 17, 2021
Homeराष्ट्रीयसुशांतवर सफेद जादूने केले उपचार ; सुशांत केसमध्ये एका गूढ आध्यात्मीक बाबाची एंट्री

सुशांतवर सफेद जादूने केले उपचार ; सुशांत केसमध्ये एका गूढ आध्यात्मीक बाबाची एंट्री

एकमत ऑनलाईन

मुंबई । अभिनेता सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणी आता एक नवी माहिती समोर येते आहे. सुशांतच्या डिप्रेशनवर इलाज करण्यासाठी रिया चक्रवर्ती त्याला माझ्याकडे घेऊन आली होती, असा खुलासा खुद्द या आध्यात्मिक गुरुने केला आहे.

मोहन सदाशिव जोशी असे या आध्यात्मिक गुरूंचे नाव आहे. एका चॅनलशी बोलताना जोशी यांनी रिया सुशांतला त्यांच्याकडे घेऊन आल्याचे सांगितले आहे. सुशांत डिप्रेशनमध्ये होता. यामुळे रिया सुशांतला माझ्याकडे घेऊन आली होती. मी त्याच्यावर उपचार केले होते. मी रिया व सुशांतसोबत भोजनही केले होते.

रियानेच माझ्याशी संपर्क करुन सुशांत नैराश्यात असल्याचे सांगितले होते, असे जोशी यांनी सांगितले. विशेष म्हणजे, मी सुशांतला 90 टक्के बरे केले होते, असा दावाही त्यांनी यावेळी केला आहे. सुशांतवर काळ्या जादूने उपचार केले का? असा प्रश्न जोशी यांना विचारला गेला. यावर याला काळी जादू म्हणता येणार नाही पण सफेद जादू म्हणू शकता. मी माझ्या हातांनी उर्जा हस्तांतरित करतो.

मुंबई पोलिसांनी मला जबाब नोंदवण्यासाठी बोलवले होते. पण प्रकृती बघता मी पोलिस ठाण्यात जाऊ शकलो नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. आध्यात्मिक गुरू जोशी यांचे वय 70 वर्षे आहे. प्रसिद्ध उद्योजक धीरूभाई अंबानी आणि कर्नाटकच्या एका माजी मुख्यमंत्री अशा अनेक दिग्गजांवर उपचार केल्याचा त्यांचा दावा आहे. सुशांत आत्महत्या प्रकरणी अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. याला आता राजकीय वळण देखील लागले आहे.

जळकोट ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,476FansLike
167FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या