21.9 C
Latur
Monday, August 15, 2022
Homeराष्ट्रीय७५० विद्यार्थिनींच्या मेहनतीने अंतराळात फडकणार ‘तिरंगा’

७५० विद्यार्थिनींच्या मेहनतीने अंतराळात फडकणार ‘तिरंगा’

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : यावर्षी १५ ऑगस्ट २०२२ रोजी देशाच्या ७५ व्या वर्षाच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त तिरंगा अवकाशात फडकवला जाणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही घोषणा केली आहे.

अंतराळात ध्वज फडकवण्याचे पंतप्रधान मोदींचे वचन पूर्ण करण्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था ७ ऑगस्ट रोजी त्यांचे सर्वात छोटे व्यावसायिक रॉकेट, स्मॉल सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल प्रक्षेपित करणार आहे, ज्याद्वारे राष्ट्रध्वज अंतराळात घेऊन जाता येणार आहे.

राष्ट्रध्वज असलेल्या ‘गगनयान’वर मानवयुक्त अंतराळ मोहीम सुरू करण्याचे स्वप्न पंतप्रधान मोदींचे यांचे होते. ५०० किलोपेक्षा कमी वजनाचे उपग्रह आणि पेलोड पृथ्वीच्या निम्न कक्षेत ठेवण्यासाठी ते विकसित करण्यात आले आहे. श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून ७ ऑगस्ट रोजी सकाळी सव्वानऊ वाजता प्रक्षेपण केले जाणार आहे.

‘आझादी का अमृत महोत्सव’ साजरा करण्याच्या दृष्टीकोनातून ररछश् ‘आझादी रअळ’ नावाचा सह-प्रवासी उपग्रह घेऊन जाणार आहे. जो देशभरातील ७५ ग्रामीण सरकारी शाळांमधील ७५० मुलींनी तयार केला आहे. वैज्ञानिक वृत्तीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि तरुण मुलींना त्यांचे करिअर म्हणून अंतराळ संशोधन करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी ७५ व्या स्वातंत्र्यदिनाच्या समारंभात या प्रकल्पाची खास संकल्पना करण्यात आली होती.

इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी नवीन उपग्रहाचे वर्णन ‘गेम चेंजर’ असे ठेवले आहे. इस्रोच्या अधिका-यांनी सांगितले की, ररछश् मिनी, मायक्रो आणि नॅनो उपग्रह ५०० किमीच्या प्लॅनर ऑर्बिटमध्ये प्रक्षेपित करण्यास सक्षम आणि तयार आहे.

पेलोड इमेजिंगसह सुधारित आणि व्यावहारिक उपग्रह डिझाइन आणि विकसित करणे हे ररछश् चे उद्दिष्ट आहे. तसेच वनीकरण, जलविज्ञान, कृषी, मृदा आणि किनारपट्टी अभ्यास या क्षेत्रातील महत्त्वाची माहिती प्रदान करेल.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या