27.1 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeराष्ट्रीयगुवाहाटीतील हॉटेलवर तृणमूलचे कार्यकर्ते आक्रमक

गुवाहाटीतील हॉटेलवर तृणमूलचे कार्यकर्ते आक्रमक

एकमत ऑनलाईन

मुंबई : एकनाथ शिंदे यांना ऑफर देण्यासाठी भाजपचे नेते सतत सुरतच्या हॉटेलवर येत होते. यानंतर आसाममध्येही सरकारचे मंत्री अशोक सिंघल शिंदेंच्या भेटीला गेले. फडणवीस दिल्लीतून सूत्रं हलवत असल्याचे कळतेय. मात्र यात उद्धव ठाकरेंनी वेगळी खेळी केल्याचे म्हटले जात आहे.

कारण ठाकरेंना समर्थन देणा-या आणि कट्टर भाजप विरोधक तृणमूल पक्षाने एकनाथ शिंदेंना घेरण्याचा प्रयत्न केला आहे. ममता बॅनर्जींनी उद्धव ठाकरेंच्या मदतीसाठी चाल खेळल्याची माहिती मिळत आहे.

गुवाहाटीतील रॅडिसन ब्लू हॉटेलबाहेर आंदोलन करणा-या टीएमसी नेते आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आसाममधील सुमारे २० लाख लोक पुरामुळे त्रस्त आहेत.

पण मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार पाडण्यात व्यस्त आहेत, असा आरोप तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. महाराष्ट्राचे बंडखोर आमदार हॉटेलमध्ये थांबले आहेत. त्यांच्या दिमतीला आमचे आसामचे मंत्री पोहोचत आहेत. त्यामुळे आम्ही आंदोलन करत असल्याचे तृणमूलच्या नेत्यांनी म्हटले आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या