कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पक्ष तृणमूल कांग्रेस उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी मतदान करणार नाही. तृणमूलच्या आज झालेल्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला.
तृणमूलचे महासचिव अभिषेक बॅनर्जी यांनी याबाबतची माहिती दिली. विरोधी पक्षांनी सल्लामसलत न करता मार्गारेट अल्वा यांच्या नावाची घोषणा केली, त्यामुळे हा निर्णय घेत असल्याचे सांगण्यात आले.