25.7 C
Latur
Thursday, March 23, 2023
Homeराष्ट्रीयसत्य खोट्या बातम्यांचे बळी ठरले

सत्य खोट्या बातम्यांचे बळी ठरले

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : अमेरिकन बार असोसिएशन इंडिया कॉन्फरन्स-२०२३ मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड म्हणाले की, सोशल मीडियाच्या युगात, जर कोणी तुमच्या विचाराशी सहमत नसेल तर ते तुम्हाला ट्रोल करण्यास सुरूवात करू शकतात. आपण अशा युगात जगत आहोत. जिथे लोकांमध्ये संयम आणि सहनशीलता कमी झाली आहे. सोशल मीडियाच्या जमान्यात जर एखाद्याला तुमचा विचार पटत नसेल तर ते तुम्हाला ट्रोल करायला लागतात असे विधान देशाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी केले.

पुढे बोलताना सरन्यायाधीश म्हणाले की, सोशल मीडियावर ज्या वेगाने खोट्या बातम्या पसरतात त्यामुळे सत्याचा बळी गेला आहे. एक खोटी गोष्ट बीजाप्रमाणे पेरली जात आहे आणि कालांतराने त्याचे रुपांतर एका मोठया सिद्धांतात होते. ज्याला तर्काच्या आधारे मोजता येत नाही. म्हणूनच कायद्याला विश्वासाचे जागतिक चलन म्हटले जाते.

संविधान जागतिकीकरणाचे सर्वात मोठे उदाहरण
अमेरिकन बार असोसिएशन (एबीए) इंडिया कॉन्फरन्स २०२३ मधील ‘लॉ इन द एज ऑफ ग्लोबलायझेशन : कन्व्हर्जन्स ऑफ इंडिया अँड द वेस्ट’ या चर्चासत्रात ते बोलत होते. ते म्हणाले की जेव्हा राज्यघटना तयार केली गेली तेव्हा ते एक दस्तऐवज होते. ज्यामध्ये जगभरातील सर्वोत्तम पद्धतींचा समावेश होता. त्यामुळे मोठे बदल होऊ शकले असते. परंतू आता आपल्या दैनंदिन जीवनावर जगात घडणा-या गोष्टींचा परिणाम होत आहे.

संविधान अद्वितीय भारतीय प्रोडक्ट
डीवाय चंद्रचूड म्हणाले की, भारतीय राज्यघटनेचे मुख्य शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाचा मसुदा तयार करण्याच्या प्रक्रियेत जागतिक सहभागाचे महत्त्व स्पष्ट केले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हटले होते की, संविधानात केवळ जगाकडून प्रेरणा घेतली गेली नाही. ज्यामध्ये देशातील जनतेच्या गरजा लक्षात घेऊन संविधानाची निर्मिती करण्यात आली आहे. हे एक अतिशय अद्वितीय भारतीय प्रोडक्ट आहे, जे जागतिक देखील आहे.

आम्हीदेखील ट्रोलिंगपासून वाचू शकत नाही
सरन्यायाधीश म्हणाले की, अनेक प्रकारे भारतीय संविधान हे जागतिकीकरणाचे सर्वात मोठे उदाहरण आहे. ते देखील अशा वेळी जेव्हा आपण जागतिकीकरणाच्या युगात प्रवेश केला नव्हता. राज्यघटनेचा मसुदा तयार झाला तेव्हा त्याच्या निर्मात्यांना जग कसे बदलेल याची कल्पना नव्हती.

Stay Connected

1,567FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या