21.4 C
Latur
Tuesday, July 27, 2021
Homeराष्ट्रीयटीव्हीवाल्यांना शाप लागेल; तेलंगणाचे मुख्यमंत्री मीडियावर भडकले

टीव्हीवाल्यांना शाप लागेल; तेलंगणाचे मुख्यमंत्री मीडियावर भडकले

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : मीडिया कोरोनाबद्दल चुकीची माहिती पसरवत आहेत आणि त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे असा आरोप केला आहे. तसेच आपण फक्त पॅरासिटामॉल आणि अँटिबायोटिक औषधे खाऊन बरे झालो असल्याचा दावा तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी केला असून, टीव्हीवाल्यांना शाप लागेल असे राव म्हणाले आहेत़

के. चंद्रशेखर राव यांना एप्रिलमध्ये कोरोनाची लागण झाली होती. फक्त दोन औषधांच्या सेवनाने ते आठवड्याभरात कोरोनातून बरे झाले असा दावा त्यांनी केला आहे़ वारंगल येथील्या एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी असे म्हटले आहे. माहीत नाही कोण ब्लॅक फंगस, यलो फंगस अशा आजारांबद्दल चुकीची माहिती पसरवत आहेत. कोणती वाहिनी आहे की कोणता पेपर आहे माहीत नाही. फंगस जिवंत आहे की निर्जीव पण लोक या गोष्टी ऐकून मरत आहेत. मी सांगतो, या टीव्हीवाल्यांना शाप लागेल असे चंद्रशेखर राव यांनी म्हटले आहे.

दिवाळीपर्यंत मिळणार मोफत अन्नधान्य

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
199FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या