24.7 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeराष्ट्रीयमंगला आरतीवेळी चेंगराचेंगरी, दोघांचा मृत्यू

मंगला आरतीवेळी चेंगराचेंगरी, दोघांचा मृत्यू

एकमत ऑनलाईन

मथुरा : श्रीकृष्ण जन्माष्टमीला जगप्रसिद्ध ठाकूर बांके बिहारी मंदिरात होणा-या मंगला आरतीवेळी झालेल्या प्रचंड गर्दीत चेंगराचेंगरी होऊन झालेल्या अपघातात दोन भाविकांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी पहाटे १.५५ वाजता ही घटना घडली. वर्षातून एकदा होणा-या मंगला आरतीसाठी हजारो भाविक मंदिर परिसरात दाखल झाले होते. त्यावेळी अचानक चेंगराचेंगरी झाली.

मथुराचे एसएसपी अभिषेक यादव यांनी सांगितले की, मथुरेच्या वृंदावन बांके बिहारी मंदिरात मंगला आरतीवेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. गर्दीमुळे अचानक चेंगराचेंगरी झाली आणि एकच खळबळ उडाली. यामध्ये एका महिलेचा तर, एका पुरुष भाविकाचा मृत्यू झाला. तर, अनेक जण जखमी झाले असून जखमी झालेल्या भाविकांना रामकृष्ण मिशन, ब्रज हेल्थ केअर आणि वृंदावन येथील सौ शैया रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे

मुख्यमंत्री योगींकडून अधिका-यांना सूचना
मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जखमींवर योग्य उपचार करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाच्या अधिका-यांना दिल्या आहेत. शहरातील गर्दी लक्षात घेता सणांच्या दिवशी मंदिरांसह ठिकठाकाणी अधिक कडक व्यवस्था करण्यात याव्यात जेणेकरून भविष्यात अशा प्रकारच्या घटना टाळता येतील असे निर्देशही मुख्यमंत्री योगींनी गृह विभागाला दिले आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या