पुलवामा : जम्मू आणि काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलांशी रात्रभर झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात भारतीय जवानांना यश आले. याबाबतची माहिती काश्मीर पोलिसांनी सोमवारी दिली. रविवारी रात्री पुलवामा येथील गुंडीपोरा परिसरात सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना शोधण्यासाठी परिसराला घेराव घातला होता. शोध मोहीम सुरू असताना अचानक चकमक सुरू झाली. रात्रभर झालेल्या चकमकीनंतर २ दहशतवाद्यांना कंठस्नान घातले व २ बंदुका जप्त केल्या.