22.8 C
Latur
Saturday, October 1, 2022
Homeराष्ट्रीयदोन काश्मिरी हिंदूंची हत्या

दोन काश्मिरी हिंदूंची हत्या

एकमत ऑनलाईन

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा टार्गेट किलिंगचा प्रकार घडला आहे. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात दोन काश्मिरी ंिहदूंची हत्या करण्यात आली आहे. शोपियाँ इथे हा अंदाधुंद गोळीबाराचा प्रकार घडला. यापूर्वी गेल्या दिवसांत सरकारी सेवेत असलेल्या हिंदू पंडितांना दहशतवाद्यांकडून हत्या करण्यात आल्या आहेत.

वारंवार होत असलेल्या या टार्गेट किलिंगमुळे काश्मीर खो-यातील वातावरण तणावपूर्ण आहे. यापार्श्वभूमीवर काश्मीरमधील हिंदूंनी सरकारकडे सुरक्षेची मागणी केली आहे. यापूर्वी काश्मीरमधील टार्गेट किलिंगवरुन मोठ्या प्रमाणावर राजकारण झाले होते. यावरुन अनेक राजकीय पक्षांनी केंद्र सरकारवर टीका केली होती.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या