24.2 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeराष्ट्रीयदेशात १५ दिवसांत दोन मोठी चक्रीवादळे!

देशात १५ दिवसांत दोन मोठी चक्रीवादळे!

- अम्फान नंतर निसर्गा - सर्वाधिक चक्रीवादळे बंगालच्या उपसागरात - नैसर्गिक कहर सुरूच

एकमत ऑनलाईन

मुंबई : वृत्तसंस्था
देशाला गेल्या १५ दिवसांत दोन चक्रीवादाळांनी तडाखा दिला असून, २० मेच्या दरम्यान ओडिशा आणि पश्चिम बंगालला बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या अम्फान वादळाने तडाखा दिला. तर ३ जून रोजी अरबी समुद्रात तयार झालेल्या निसर्ग वादळाने महाराष्ट्र आणि गुजरातला तडाखा दिला आहे.

विशेष म्हणजे भारताला बंगालचा उपसागर, हिंदी महासागर आणि अरबी समुद्र या तीन समुद्रांनी वेढले आहे. त्यातील बंगालच्या उपसागरात सर्वात जास्त वादळे येतात. भारताबरोबच जगात अशी काही ठिकाणे आहेत जेथे वारंवार चक्रीवादळे धडकत असतात. त्यातील काही वादळे कमी तीव्रतेची तर काही जास्त तीव्रतेची वादळे असतात.

Read More  चक्रीवादळापूर्वीच शहरात पडली २० झाडे

जगभरात काही अशी चक्रीवादळे येऊन गेली आहेत, ज्यांनी भरपूर नुकसान केले आहे. या वादळामुळे प्रभावित भागात प्रचंड वेगाने वारे वाहत होते आणि मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला होता. ज्यामुळे त्या भागातील जिवितहानी झाली होती. काही वादळांमुळे मोठी जिवितहानी झाली, तर काही वादळांनी वित्तहानी अशा प्रकारे झाली की प्रभावित भागाला त्यातून बाहेर पडण्यासाठी अनेक वर्षे लागली.

वादळांच्या तीव्रतेनुसार त्याची वर्गवारी
१ : यामध्ये चक्रीवादळाचा वेग हा ११९ ते १५३ किमी प्रतीतास
२ : यामध्ये चक्रीवादळाचा वेग हा १५४ ते १७७ किमी प्रतीतास
३ : यामध्ये चक्रीवादळाचा वेग हा १७८ ते २०८ किमी प्रतीतास
४ : यामध्ये चक्रीवादळाचा वेग हा २०९ ते २५१ किमी प्रतीतास
५ : यामध्ये चक्रीवादळाचा वेग हा २५२ किमी प्रतीतासापेक्षा जास्त असतो.

भारतीय उपखंडात आलेली विध्वंसक चक्रीवादळे हुगली रिव्हर चक्रीवादळ
या वादळाला हुगली किंवा कलकत्ता वादळही संबोधले जाते. हे वादळ इतिहासातील सर्वात विध्वंस करणारे वादळ म्हणून ओळखले जाते. हे वादळ गंगा नदीच्या खोºयात म्हणजेच बंगालच्या भागात ११ आॅक्टोबर १७३७ रोजी धडकले होते. हे वादळ जेव्हा किनाºयाला धडकले त्यावेळी जवळपास ६ तास ३८१ मिलीमीटर पाऊस म्हणजे जवळपास १५ इंच पाऊस पडला होता. हे वादळ किना-याला धडकले त्यावेळी त्याचा वेग ३३० किमी इतका होता. या वादळाच्या तडाख्यात जवळपास ३० हजार ते ३५ हजार लोकांचा मृत्यू झाला होता.

द ग्रेट भोला चक्रीवादळ
बांगलादेशाला अनेकवेळा चक्रीवादळाने तडाखा दिला आहे. १९७० साली बांगलादेशला धडकलेल्या चक्रीवादळापैकी द ग्रेट भोला चक्रीवादळ हे सर्वात जास्त तीव्रतेचे वादळ होते. या वादळामुळे किनारपट्टीच्या भागाचे स्मशानातच रुपांतर झाले होते. हजारो लोक मरण पावले होते़ तर अनेक लोकांच्या काहीच थांगपत्ता लागला नव्हता. सुरवातीला ११ नोव्हेंबरला या चक्रावादळाचा वेग हा १३७ किमी ते १४५ किमी होता. त्यानंतर याचा वेग वाढत जाऊन तो २२० किमी प्रतीतास इतका झाला होता. वादळाची एकदमच तीव्रता वाढल्याने कमीतकमी ३० हजार लोकांचा यात मृत्यू झाला. काहींच्या मते हा आकडा ५० हजार एवढा होता. अशाचप्रकारच्या अजून एका वादळाने बांगलादेशला १९९१ ला तडाखा दिला होता. त्यात १ लाख ३८ हजार लोकांचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता.

नर्गिस चक्रीवादळ
२००८ मध्ये आलेल्या या वादळामुळे एक शहर, राज्य नाही तर अनेक देशांचे नुकसान झाले होते. आशिया खंडातील १९९१ मध्ये बांगलादेशला धडकलेल्या वादळानंतर सर्वात भयानक असे हे नर्गिस चक्रीवादळ होते.
नर्गिसचा तडाखा हा भारत, थायलंड, म्यानमार, श्रीलंका, लाओस, बांगलादेश आणि इतर भागांना बसला होता. हे लेवल ४ चे वादळ होते. या वादळामुळे जवळपास १ लाख ४० हजार लोकांचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. पण, याचा खरा आकडा हा १० लाखांच्या वर असल्याचा काहींचा दावा आहे. अजून ज्ञात आणि अज्ञात अशी अनेक वादळे जगाच्या अनेक भागात तयार झाली होती किंवा होणार आहेत. या भयानक वादळापासून वाचण्याचा एकच मार्ग आहे. लवकरात लवकर याबाबत इशारा मिळणे आणि त्यानंतर लवकरात लवकर सुरक्षित स्थळी पोहचणे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या