25.4 C
Latur
Wednesday, May 19, 2021
Homeराष्ट्रीयदेशातील ८० कोटी लाभार्थ्यांना दोन महिने मोफत धान्य

देशातील ८० कोटी लाभार्थ्यांना दोन महिने मोफत धान्य

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशात कोरोनामुळे पुन्हा एकदा स्थिती चिंताजनक झाली आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी अनेक राज्यांनी लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. तर काही राज्यांनी कडक निर्बंध लादले आहेत. अशावेळी हातावर पोट असणा-यांसाठी सरकारने एक पाऊल पुढे टाकलेआहे. गरीब जनतेची हेळसांड होऊ नये म्हणून पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत मे आणि जून महिन्यात ५ किलो मोफत धान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेचा ८० कोटी नागरिकांना फायदा होणार आहे.

या निर्णयामुळे गरीब जनतेला दिलासा मिळणार आहे. या योजनेवर केंद्र सरकार २६ हजार कोटी रुपये खर्च करणार आहे. कोरोनामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या गरीबांच्या समस्या कमी करण्याच्या उद्देशाने सरकारने मार्च २०२० मध्ये प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज जाहीर केले होते. या पॅकेजअंतर्गत प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेतून दर महिन्याला दरडोई पाच किलो गहू अथवा तांदूळ मोफत देण्यात येत होते. या योजनेतल्या जवळपास ८० कोटी लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य देण्यात आले होते़ आता पुन्हा तीच स्थिती पुन्हा निर्माण झाली आहे. त्यामुळे संकटाच्या काळामध्ये पुन्हा एकदा सरकारने दोन महिने मोफत धान्य देण्याचा निर्णय घेतला आहे.

गरीब, गरजूंना मोठा दिलासा
नोव्हेंबर २०२० पासून केंद्र शासनाने पंतप्रधान गरीब कल्याण योजना बंद केली होती. आता लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना पुन्हा राबवल्याने गरीब आणि गरजू नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

पोलिस निरीक्षक सुनील मानेंना अटक

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,498FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या