नवी दिल्ली: चीनबरोबरच्या तणावाच्या पार्श्वभुमीवर भारताने अमेरिकेकडून दोन प्रीडेटर ड्रोन भाडेतत्त्वावर घेतली आहेत. पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष ताबा रेषेवर ही ड्रोन तैनात केले जाण्याची शक्यता आहे. संरक्षण मंत्रालयाने आपत्कालीन खरेदी अधिकारांतर्गत ही ड्रोन नौदलात समावेश केली आहेत. भारत-चीनमधीन वाढत्या तणावाच्या पार्श्वभुमीवर ही ड्रोन सामील केली आहेत. नोव्हेंबरच्या दुसºया आठवड्यात हे ड्रोन भारतात आले आणि आयएनएस रजाली येथील भारतीय नौदल तळावर २१ नोव्हेंबरला उड्डाण संचालनात त्यांचा समावेश झाला, अशी माहिती उच्च सरकारी सूत्रांनी दिली आहे.
ड्रोनची उड्डाणे आधीच सुरू झाली आहेत आणि ३० तासांहून अधिक काळ हवेत राहण्याच्या क्षमतेमुळे नौदलासाठी महत्त्वाची गोष्ट ठरली आहे. एक अमेरिकन क्रू नौदलाला मशीन्स आॅपरेट करण्यास मदत करतील, असेही सूत्रांनी सांगितले.
भारत -अमेरिके दरम्यान सहकार्य वाढणार
नौदलाकडे आधीपासूनच ९ पी-८ आय लाँग रेंजची पाळत ठेवणारी विमाने असून पुढील काही वर्षांत अशी आणखी ९ विमाने मिळतील. भारत हेलिकॉप्टरमध्ये २४ एमएच -६० रोमियो खरेदी करणार आहे. यासाठी भारत आणि अमेरिकेने संरक्षण आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या क्षेत्रात सहकार्यासाठीही करार केले आहेत.
ड्रोनच्या वापराबाबत असे नियोजन
– एका वर्षासाठी भाडेतत्वावर
– सैन्याच्या तिन्ही दलांकडून आणखी १८ ड्रोन घेण्याची तयारी
– अमेरिका फक्त देखभाल व तांत्रिक अडचणी पाहणार
– इतर सर्व नियोजन भारतीय नौदलाकडे
– डेटा भारतीय नौदलाची मालमत्ता
मुंबईवर हल्ल्याचे इस्त्रायलमध्ये स्मारक