22.8 C
Latur
Saturday, October 1, 2022
Homeराष्ट्रीयअल कायदाशी संबधित दोन संशयित दहशतवाद्यांना अटक

अल कायदाशी संबधित दोन संशयित दहशतवाद्यांना अटक

एकमत ऑनलाईन

बारपेटा : आसाममध्ये दहशतवादी मॉड्यूलचा भंडाफोड केल्यानंतर संशयित दहशतवाद्यांना अटक करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. दहशतवादी लिंक प्रकरणात पोलिसांनी गेल्या १० दिवसांत सहा जणांना अटक केली आहे. आता बारपेटा जिल्ह्यातून दोन संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. बारपेटा एनसी अमिताव सिन्हा यांनी सांगितले की, दोन्ही संशयितांचे अल कायदा आणि अंसारुल्लाह बांगला टीमशी संबंध आहेत.

बारपेटा येथील एका मदरशामध्ये सरकारी जमिनीवर बेकायदेशीरपणे बांधण्यात आल्याने पोलिसांनी दखल मोहीम सुरू केली. अटक करण्यात आलेल्या दोन्ही संशयितांचे संबंधही या मदरशाशी असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. पोलिसांनी सांगितले की, बारपेटा जिल्ह्यातून अटक करण्यात आलेल्या संशयित दहशतवाद्यांची ओळख पटली आहे. एकाचे नाव अकबर अली आणि दुसऱ्याचे अबुल कलाम आझाद असे आहे.

दहशतवादी लिंक प्रकरणात पोलिसांनी गेल्या १० दिवसांत सुमारे सहा जणांना अटक केली आहे. यापूर्वी गोलपारा येथून चार जणांना अटक करण्यात आली आहे. २६ ऑगस्ट रोजी पोलिसांनी गोलपारा येथील मदरशातून हाफिजुर रहमान मुफ्ती नावाच्या व्यक्तीला अटक केली होती. त्याचा दहशतवादी संघटनांशीही संबंध होता. ही व्यक्ती येथील एका मदरशात शिक्षक होती.

नुकतेच आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी आवाहन केले होते की, आम्ही काही एसओपी (स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर) बनवल्या आहेत, जर तुमच्या गावात कोणी इमाम आला आणि तुम्ही त्याला ओळखत नसाल तर लगेच पोलीस स्टेशनला कळवा, ते पडताळणी करतील त्यानंतरच ते इथे राहू शकतात.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या