28.3 C
Latur
Friday, June 25, 2021
Homeराष्ट्रीययू-टर्न : कोरोनावर औषध बनवलंच नाही

यू-टर्न : कोरोनावर औषध बनवलंच नाही

एकमत ऑनलाईन

मुंबई : ‘कोरोनिल’ हे कोरोनावरील औषध मिळाल्याचा दावा बाबा रामदेव यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. एवढंच नव्हे तर औषध बाजारात आणलं होतं. यावरून खूप गोंधळ झाला होता. आता या औषधावरून पतंजली आयुर्वेद कंपनीने यू-टर्न घेतला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, पतंजलीने उत्तराखंड आयुष विभागानं नोटीस जारी केल्यानंतर पंतजलीने कोरोनावरील औषध बनवल्याच्या दाव्यावरून यू-टर्न घेतला आहे.

गेल्या मंगळवारी बाबा रामदेव यांनी आपली कंपनी पंतजली आयुर्वेदचे सीईओ आचार्य बालकृष्णने पत्रकार परिषद घेऊन कोरोनावर आयुर्वेदिक औषध मिळाल्याचा दावा केला. कोरोनिल नावाचं औषध पतंजलीनं लॉन्च केलं. केंद्रीय आय़ुष मंत्रालयानं औषधाच्या जाहिरातीवर बंदी आणत औषधाच्या चाचण्या सुरू केल्या.

या औषधाचं मंगळवारी अनावरणही करण्यात आलं. ज्यानंतर केंद्राकडून पतंजली आयुर्वेदीक लिमिटेडला नोटीस बजावण्यात आली असून, या औषधाचा तपशील आणि त्याच्या वैद्यकिय चाचणीचे, निकालाचे अहवाल सादर करण्याची विचारणा करण्यात आली आहे.

आयुष मंत्रालयानं उत्तराखंड, हरिद्वारस्थित पतंजली आयुर्वेदीक लिमिटेडच्या नावे एक पत्रक जारी केलं. बातम्यांमध्ये या औषधाबाबतची माहिती मिळताच मंत्रालयानं ही पावलं उचललल्याचं म्हटलं जात आहे. ज्यामध्ये मंत्रालयानं औषधाची सर्व माहिती, त्याचा अभ्यास, वैद्यकिय तपशील अशी सर्व माहिती मागवली आहे.

Read More  निलंगा शहर, पसिरात जोरदार पाऊस

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
202FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या