लखनौ : हाथरस अत्याचार प्रकरणानंतर येथे जातीय दंगल घडवून आणण्याचा कट रचल्याप्रकरणी उत्तर प्रदेशच्या विशेष कृती दलाने (एसटीएफ) पाच हजार पानांचे दोषारोपपत्र दाखल केले आहे. संशयित आरोपींविरोधात दहशतवादविरोधी कारवाईंना आळा घालण्यासाठीच्या बेकायदा कारवाया प्रतिबंध कायदान्वये (युएपीए) गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये केरळमधील पत्रकार सिद्दीकी कप्पन याच्यासह अन्य आरोपींचा समावेश आहे. याप्रकरणी कप्पन याला ऑक्टोबर २०२० मध्ये अटक करण्यात आली होती.
हाथरसमध्ये जातीय दंगल घडवून आणण्याचा कट रचल्याप्रकरणी एसटीएफने मथुरा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. याप्रकरणी कप्पन हा हाथरस येथे वार्तांकनासाठी जात असताना त्याला अटक करण्यात आली होती. त्याच्यासह आठ जणांवर जातीय तेढ निर्माण करण्याचा आरोप आहे. संशयित आरोपींपैकी तिघांना कप्पन बरोबर असतानाच अटक करण्यात आली होती. दहशतवादी कारवायांसाठी पैसा गोळा करण्याचा आरोपही कप्पन याच्यावर आहे. तो सध्या मथुरा कारागृहात आहे.
पाच हजार पानांच्या दोषारोपपत्रात एसटीएफने हाथरस दंगलीच्या कटाचा खुलासा केला आहे. मथुरा येथे अटक करण्यात आलेल्या कप्पन यानेच दंगल घडवून आणण्याचा कट रचला होता. तसेच तो पीएफआय विद्यार्थी संघटनेसाठी निधीही गोळा करत होता. या संघटनेचा सचिव रउफ शरीफ यांच्यविरोधात यापूर्वीच ईडीने दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
नक्षली हल्ल्यात २२ जवान शहीद; १४ जवानांचे मृतदेह सापडले, ९ नक्षल्यांचा खात्मा