26.1 C
Latur
Sunday, September 19, 2021
Homeराष्ट्रीययूजीसी नेट परीक्षा कोरोनामुळे रद्द

यूजीसी नेट परीक्षा कोरोनामुळे रद्द

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : विद्यापीठ अनुदान आयोग राष्ट्रीय पात्रता चाचणी मे २०२१ सत्राची सुधारीत तारीख लवकरच जाहीर केली जाऊ शकते. राष्ट्रीय चाचणी एजन्सीच्या अधिकृत वेबसाईटवर परीक्षेची तारीख जाहीर केली जाईल. यापूर्वी एनटीएने यूजीसी नेटच्या परीक्षेची तारीख २ फेब्रुवारी रोजी जाहीर केली होती. ज्या अंतर्गत २ ते १७ मे दरम्यान परीक्षा घेण्यात येणार होती. पण त्यानंतर देशात कोरोना विषाणूच्या महामारीची दुसरी लाट आली आणि परीक्षा पुढे ढकलावी लागली.

यूजीसीने मे महिन्यात होणा-या परीक्षा पुढे ढकलण्याबाबत नोटीस बजावली होती. ज्यामध्ये हे सांगण्यात आले होते की कोरोना परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर नवीन तारखांची घोषणा केली जाईल. तसेच नवीन तारखांची घोषणा १५ दिवस अगोदर जाहीर केली जाईल. अशा स्थितीत आता सुधारीत परीक्षेची तारीख आॅगस्टच्या दुसºया किंवा तिसºया आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. तथापि, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही.

कधी जारी होऊ शकते प्रवेशपत्र?
यापूर्वी अशी अपेक्षा होती की एनटीए एप्रिल महिन्यात परीक्षेसाठी प्रवेशपत्र देईल. पण नंतर परीक्षा पुढे ढकलण्यात आली. अशा परिस्थितीत आता असे म्हटले जात आहे की परीक्षेच्या जून सत्रासाठी प्रवेश पत्र जुलै आणि डिसेंबर सत्रासाठी प्रवेश पत्र नोव्हेंबरमध्ये येऊ शकेल. त्यानंतर उमेदवार वेबसाईटवर जाऊन ते डाउनलोड करू शकतील. अ­ॅडमिट कार्डाची माहिती देण्याबरोबरच परीक्षेच्या नव्या तारखांची माहिती देईल. जेव्हा प्रवेशपत्रे दिली जातील, तेव्हा अधिकृत वेबसाईटवर आवश्यक माहिती प्रविष्ट करुन उमेदवार त्यांना डाउनलोड करण्यास सक्षम असतील.

‘पुणे मेट्रो ट्रायल रन’ यशस्वी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या