24.2 C
Latur
Tuesday, November 30, 2021
Homeराष्ट्रीयगंगा, उपनद्यांवर जलविद्युत प्रकल्पांच्या कायमच विरोधात - उमा भारतींची स्पष्टोक्ती

गंगा, उपनद्यांवर जलविद्युत प्रकल्पांच्या कायमच विरोधात – उमा भारतींची स्पष्टोक्ती

एकमत ऑनलाईन

लखनौ : उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील नंदादेवी हिमकड्याचा काही भाग कोसळल्याने रविवारी धौलीगंगा नदीला मोठा पूर आला. या प्रलयामध्ये सोमवार सकाळपर्यंत १४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तर १५० जण अजूनही बेपत्ता आहेत. या दूर्घटनेनंतर भाजपाच्या वरिष्ठ नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी रविवारी रात्री ट्विटरवरुन आपल्या भावना व्यक्त केल्या.

हिमकडा तुटल्याने आलेला प्रलय हा चिंतेचा विषय असल्याचे उमा भारती यांनी म्हटले आहे. त्याचप्रमाणे त्यांनी यासंदर्भात इशाराही दिला आहे. आपण स्वत: मंत्री असताना गंगा नदी आणि त्याच्या मुख्य उपनद्यांवर धरणे बांधून विजनिर्मिती करण्यास माझा विरोध होता, असेही उमा यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदा सत्तेत आल्यानंतर उमा भारती या जल संवर्धन, नदी विकास आणि गंगा संरक्षण मंत्री होत्या.

रविवारी हिमकडा कोसळून घडलेल्या दूर्घटनेनंतर उमा यांनी अनेक ट्विट केले आहेत. हिमकडा तुटल्याने जो प्रलय आला आहे़ त्यामुळे जलविद्यृत निर्मितीला मोठा फटका बसल्याचे त्यांनी म्हटले आहे. जोशीमठापासून २४ किलोमीटर दूर असणा-या चमोली जिल्ह्यातील पैंग गावाजवळ हिमकडा तुटल्याने ऋषिगंगा नदीवर बनवण्यात आलेला वीज प्रकल्प पूर्णपणे नष्ट झाला असून या पुराचे पाणी वेगाने पुढे सरकत आहे. मी गंगा मातेला प्रार्थना करते की तिने सर्वांची रक्षा करावी. तिने सर्व प्राण्यांचे संरक्षण करावे अशी मी प्रार्थना करते, असे ट्विट उमा यांनी केले आहे.

एमएसपी होता, एमएसपी आहे आणि तो भविष्यातही राहणार – पंतप्रधानांचे संसदेत आश्वासन

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या