नवी दिल्ली : पुर्व लडाखमध्ये चीनकडून गेले सहा महिने तणाव कायम ठेवण्यात आला आहे. एकीकडे चर्चेची बात करणाºया चीनकडून दुसरीकडे मात्र सीमेपलीकडून युद्धाची जोरदार तयारी केली जात आहे. जमिनीखाली ‘डिफेन्स टनेल’ तयार करुन चीनला त्याच्याच चालीने मात करण्याची व्युहरचना भारताने आखली आहे. चीन व भारत यांच्यामधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील तणाव सातत्याने वाढतच आहे. चीनकडून सातत्याने मानसिक पातळीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला जात आहे. गेल्या सहा महिन्यात जेव्हाही दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये चकमकी झाल्या आहेत, तेव्हा भारतीय जवानांनी मोठे मजबुत मनोबल दाखवित चीनवर कडी केली आहे.
भारतीय सैनिकांचा तडाखा बसल्यानंतर ताळ्यावर येणाºया चीनकडून चर्चेचे सोंग घतले जाते, मात्र दुसरीकडे आक्रमक भुमिका कायम ठेवली जाते. तणाव ढिला केल्याचा देखावा करीत भारतीय सैनिकांना गाफील ठेवण्याची चाल चीनकडून केली जात आहे. दुसरीकडे चीनने त्याच्या सीमेत मोठा फौजफाटा व शस्त्रसामुग्री जमवली आहे. भारतानेही चीनच्या सर्व चाली जाणून घेत जशास तसे धोरण ठेवले आहे. भारताच्या तयारीतून ते दिसून येत आहे.
चीनच्या बोगद्यांना ‘डिफेन्स टनेल’ने उत्तर
चीनने ल्हासाच्या विमानतळावर विमाने तैनात करण्यााठी बोगदे तयार केले आहेत.तसेच दक्षिण चीन समुद्रात अण्वस्त्र वाहू पाणबुड्या ठेवण्यासाठी हैनान बेटांवर जमिनीखाली तयारी सुरु केली आहे. भारतानेही याच व्युहनीतीचा आधार घेत कॉंक्रीटचे मोठे बोगदे तयार केले आहेत. बोगद्यांची रचना मोठ्या पाईपसारखी असून ह्युम कॉंक्रीट बोगद्यांमुळे शत्रुच्या हल्ल्यापासून भारतीय सैन्याचे संरक्षण करता येणार आहे. तसेच संकटसमयी गनिमी पद्धतीने हल्लाही करता येणार आहे.
ह्युम पाईपची रचना
ह्युम पाईपचा व्यास हा ६ ते ८ फुट इतका असतो. पाईपमधून जवान एका भागातून दुसºया भागात सहज जाऊ शकतात. परिणामी शत्रुच्या गोळीबारापासून जवानांचा बचाव होतो. बाहेरील वातावरण अतिशय थंड असल्यास पाईपमधील वातावरण गरम ठेवता येत असल्याने जवानांना कडक थंडीपासूनही बचाव मिळवता येतो. हिमवृष्टी, वादळातही संरक्षण मिळवता येते.
जपान विरोधात युद्धात चीनकडून वापर
चीनने जपानविरुद्धच्या युद्धात अशाच ‘डिफेन्स टनेल’ चा वापर केला होता. जपानविरोधात युद्धात चीनला त्याचा चांगला लाभ झाला होता.
निवडणूक घेऊन तेरणाचा हंगाम सुरू करा