29.2 C
Latur
Friday, May 7, 2021
Homeराष्ट्रीयबेरोजगारी नोटाबंदीमुळेच - माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे मत

बेरोजगारी नोटाबंदीमुळेच – माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे मत

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशात सातत्याने बेरोजगारांच्या संख्येत वाढ होत असल्याचे म्हणत काँग्रेसकडून केंद्र सरकारवर टीका करण्यात येत आहे. भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी मंगळवारी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. यावेळी त्यांनी नोटबंदीचा निर्णय चुकीचा होता असा पुनरुच्चारही केला. भाजप सरकारने कोणताही विचार न करता घेतल्या गेलेल्या निर्णयामुळेच देशात बेरोजगारीचे प्रमाण वाझत आहे. तसेच, असंगठित क्षेत्रही मोडकळीस आले आहे, असं ते म्हणाले.

तसेच, मोदी सरकार राज्यांसोबत नियमितपणे विचार-विनिमय करत नसल्याचा आरोपही मनमोहन सिंग यांनी यावेळी केला. केरळमध्ये राजीव गांधी डेव्हलपमेंट स्टडिजच्या व्हर्च्युअल संमेलनाचे उद्घाटन करताना डॉ. मनमोहन सिंग यांनी यावर भाष्य केले. सरकार आणि रिझर्व्ह बँकेच्या तात्पुरत्या उपाययोजनांनी पतपुरवठा समस्या लपवता येणार नाही. या संकटाचा परिणाम लघु आणि मध्यम क्षेत्रावर होऊ शकतो, असे ते म्हणाले. देशात बेरोजगारी अधिक आहे आणि असंघटीत क्षेत्र ढासळले आहे़ हे संकट २०१६ मध्ये कोणत्याही विचारांशिवाय घेण्यात आलेल्या नोटबंदीच्या निर्णयामुळे उद्भवले आहे, असेही त्यांनी नमूद केले.

संघटना आणि राज्यांशी नियमितपणे सल्लामसलत करणे, ही भारताची आर्थिक आणि राजकीय आधारभूत संस्था आहे आणि घटनेत याबद्दल लिहिण्यात आलं आहे. परंतु विद्यमान केंद्र सरकार त्याला महत्त्व देत नाही, असे सिंग म्हणाले. यावेळी त्यांनी केरळच्या विकासावर भाष्य केले. तसेच, भविष्यात या ठिकाणी अन्य पर्यायांवरही लक्ष देणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे़

बाधा पार करून पुढे जायचे आहे
या ठिकाणी अनेक बाधा आहेत. यातून राज्याला पुढे न्यायाचे आहे. डिजिटल प्रणालीमुळे माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्र काम करू शकत आहे. परंतु पर्यटन क्षेत्राला कोरोनाच्या महासंकटाचा मोठा फटका बसला आहे. शिक्षण आणि आरोग्यावर लक्ष दिल्यामुळेच केरळचे लोकं देशात आणि जगातील अन्य भागांमध्ये नोकरी मिळवण्यास सक्षम झाले आहेत, असेही मनमोहन सिंग म्हणाले.

जनता कर्फ्यूचा एसटीला फटका

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या