19 C
Latur
Sunday, November 27, 2022
Homeराष्ट्रीयदेशातील १० राज्यात बेरोजगारीची समस्या चिंताजनक

देशातील १० राज्यात बेरोजगारीची समस्या चिंताजनक

एकमत ऑनलाईन

नवीदिल्ली :कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जारी केलेल्या लॉकडाऊनमध्ये देशात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली. सध्या अनलॉकनंतर त्यात सुधारणा होत असून परिस्थिती पुर्ववत होण्यास सुरुवात झाली आहे. मात्र तरीही देशातील १० राज्यांमधील बेरोजगारीचे प्रमाण चिंताजनक असल्याचे दिसून येत आहे. त्यातही उत्तरप्रदेशपेक्षा महाराष्ट्रातील बेरोजगारीचा दर अधिक असल्याचे दिसून येत आहे.

सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकनॉमीने (सीएमआयई) नुकतीच बेरोजगारीविषयीची आकडेवारी जाहीर केली. अनलॉकनंतर देशातील बेरोजगारांच्या संख्येत कमालीची घट झाल्याचे त्यात दिसून येत आहे. मात्र १० राज्यांमधील बेरोजगारीचे प्रमाण अद्यापही चिंताजनक असल्याचेही या आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे. पर्यटन व्यवसायावर आधारित राज्यामध्ये बेरोजगारी वाढल्याचे चित्र दिसत आहे. विशेष म्हणजे या आकडेवारीमध्ये महाराष्ट्रातील बेरोजगारीचे प्रमाण हे उत्तर प्रदेशपेक्षाही अधिक असल्याचे दिसत आहे.

हरयाणामध्ये १९.१७ टक्के लोक बेरोजगार असून त्या खालोखाल राजस्थानमध्ये बेरोजगारीचे प्रमाण १५.३० टक्के तर दिल्लीत १२.५ टक्के इतके आहे. बिहारमध्ये बेरोजगारांची संख्या ११.९ टक्के इतकी आहे.

उत्तराखंडमध्ये सर्वाधिक तर ओदिशात सर्वात कमी
डोंगराळ प्रदेशांमधील राज्यांमध्येही बेरोजगारांचे प्रमाण अधिक आहे. हिमाचल प्रदेशमध्ये १२ टक्के तर उत्तराखंडमध्ये सर्वाधिक म्हणजेच २२.३ टक्के लोक बेरोजगार आहेत. त्रिपुरामध्ये १७.४ टक्के, गोव्यात १५.४ टक्के आणि जम्मू काश्मीरमध्ये १६.२ टक्के लोक बेरोजगार आहेत. महाराष्ट्रामध्ये ४.५ टक्के तर उत्तर प्रदेशमध्ये ४.२ टक्के जनता बेरोजगार आहे. ओदिशामध्ये सर्वात कमी म्हणजेच २.१ टक्के लोक बेरोजगार आहेत.

राजदच्या मुद्द्याला शह ?
सध्या बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे. प्रचारात राजदच्या तेजस्वी यादव यांनी १० लाख सरकारी नौक-यांचे आश्वासन दिले आहे. मात्र या आकडेवारीत बिहारमध्ये इतर मोठ्या राज्यांपेक्षा कमी म्हणजे ११.९ टक्के लोक बेरोजगार आहेत,असे दिसून येत आहे. त्यामुळे बेरोजगारीच्या मुद्द्यावरुन नितिशकुमार सरकारवर टीका करणा-या तेजस्वी यादव यांना शह बसणार असल्याचे सांगितले जात आहे. पश्चिम बंगाल आणि पंजाबमध्येही बेरोजगारीची संख्या दुहेरी आकडेवारीच्या आसपास आहे. बंगालमध्ये ९.३ टक्के तर पंजाबमधील ९.६ टक्के लोकांच्या हाती काहीच काम नसल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे. झारखंडमध्ये बेरोजगारीचे प्रमाण ८.२ टक्के आहेत.

अर्थव्यवस्थेत अजुनही पुरेशी मागणी नाही
अर्थव्यवस्थेमध्ये अजूनही मागणी पुरेशा प्रमाणात नसल्याने रोजगारनिर्मिती मोठ्या प्रमाणात होत नसल्याचे अर्थतज्ज्ञांचे मत आहे. देशातील अनेक औद्योगिक शहरांमध्ये कोरोनापूर्वी ज्या पद्धतीने काम केले जात होते तेवढ्या मोठ्या प्रमाणात काम सुरु झालेले नाही. कोरोनाबरोबरच अन्य प्रकारेही बेरोजगारी वाढल्याचे सांगितले जात आहे. ग्रामीण भागामध्येही रोजगाराच्या संधी उपलब्ध नाहीत.

पर्यटन व्यवसाय बंदमुळे डोंगरी राज्यांना तोटा
लॉकडाऊनमुळे पर्यटन व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. त्यामुळेच उत्तराखंड, हिमाचल, जम्मू-काश्मीरमध्ये बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पर्यटन व्यवसाय पूर्वीप्रमाणे पूर्ण जोमाने सुरु होईपर्यंत ही परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. देशातील वाहतूक, मनोरंजन, रिटेल आणि हॉटेल उद्योग कोरोनापूर्व काळाप्रमाणे सुरु झालेले नाहीत. परिणामी दिल्ली-एनसीआरसारख्या शहरी भागांमध्येही बेरोजगारी वाढली आहे.

रुपाली चाकणकर यांनी केली बार्शी तालुक्यातील अतिवृष्टीने झालेल्या नुकसानग्रस्त भागांची पाहणी

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या