24.4 C
Latur
Monday, September 20, 2021
Homeराष्ट्रीयकेंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन ठरले बळीचा बकरा

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन ठरले बळीचा बकरा

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रीमंडळातील आरोग्य मंत्री असणारे हर्षवर्धन यांचा राजीनामा घेण्यात आला. तोच मुद्दा धरत कॉंग्रेसने भाजपवर निशाणा साधला आहे. कोरोना महामारीच्या काळात कोरोना परिस्थितीशी दोन हात करण्यात भाजप अयशस्वी ठरली. पण, त्याचे खापर आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्यावर फोडत नरेंद्र मोदी हात झटकायला मोकळे झाले आहे. कोरोनाचे अपयशातील बळीचा बकरा डॉ. हर्षवर्धन ठरलेले आहेत.

काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी ट्विट करून केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन आणि आरोग्य राज्यमंत्री अश्विनी चौबे यांचे राजीनामे, याचे स्पष्ट पुरावे आहेत की, मोदी सरकार कोरोना महामारीशी लढण्यात पूर्णपणे अयशस्वी ठरलेली आहे. पी. चिदंबरम यांनी दावा केला आहे की, घेण्यात आलेले राजीनामे मंत्र्यांना एक धडा आहे. जर परिस्थिती व्यवस्थित झाली की, त्याचे श्रेय पंतप्रधानांना जाणार, परंतु परिस्थिती हाताबाहेर गेली की, त्यामध्ये संबंधित मंत्र्यांवर कु-हाड कोसळणार. हुजरेगिरी करणा-यांना त्यांची किंमत मोजावी लागतेच.

कोरोनाचे खापर दुस-यांवर फोडले
काँंग्रेसचे प्रवक्ता रणदीप सुरजेवाला म्हणाले की, कोरोनाची परिस्थिती ज्या नॅशनल डिजास्टर मॅनेजमेंट ऑथेरिटीच्या माध्यमातून केली जात आहे. त्याचे प्रमुख स्वत: पंतप्रधान आहेत. तर, कोरोनाची परिस्थिती बिघडली असेल, तर त्याची जबाबदारी ते का घेत नाहीत? राजीनामे फक्त आरोग्यमंत्री देणार आणि त्यांना बळीचा बकरा बनवून, स्वत: निर्दोष असल्याचा डंका वाजविणार, अशी टीका सुरजेवाला यांनी केली आहे.

कोरोनाची तिसरी लाट ९८ दिवसांची?

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या